- प्रज्ञा म्हात्रे/जान्हवी मोर्ये ठाणे/डोंबिवली : ‘शुभमंगल सावधान’ हा इशारा खरे तर नव्या उमेदीने नवे आयुष्य सुरू करण्याचा. मात्र, लग्नवेदीवर पाऊल ठेवण्यासाठी मुहूर्त काढलेल्या आणि हॉल, कॅटरर्सचे बुकिंग केलेल्या अनेकांनी ‘कोरोना सावधान’ या सरकारच्या इशाऱ्याने केलेले बुकिंग रद्द केले अथवा पुढे ढकलल्याने लग्न, मुंजी, बारसे, वाढदिवस अशा कार्यक्रमांच्या उत्साहावर बोळा फिरला आहे.हॉल व्यावसायिक रोहितभाई शहा म्हणाले की, आमच्या हॉलमध्ये बुकिंग केलेले काही घरगुती समारंभ रद्द केले आहेत. आम्ही त्यांना तारखा पुढे ढकलण्यास सांगितले आहे. तर, अन्य एका हॉलचे महेश चाफेकर म्हणाले की, आमच्याकडील कोणताही सोहळा रद्द झालेला नाही. तसेही आम्ही सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी घेत आहोत.कल्याण-डोंबिवलीतील सभागृहांतील कार्यक्रम रद्द झाले आहेत. मार्च महिना असल्याने विवाहसोहळे आणि साखरपुड्याचे कार्यक्रम फारसे नव्हते. मात्र, सामाजिक संस्थांचे तसेच बारशाचे कार्यक्रम रद्द झाले आहेत. कोरोनाचे संकट गहिरे झाले, तर मात्र एप्रिलमधील लग्नाच्या मुहूर्तांना मोठा फटका बसेल.डोंबिवलीतील सभागृह व्यवस्थापक शैलेश बने म्हणाले की, आमच्या सभागृहातील सामाजिक संस्थांचे कार्यक्रम रद्द झाले आहेत. एप्रिलमध्ये काही लग्नाचे मुहूर्त असून कोरोनामुळे समारंभावर लागू केलेली बंदी मार्चअखेरनंतर वाढली, तर मोठा फटका बसेल, असे बने म्हणाले. सध्याचे रद्द केलेले कार्यक्रम पुढे ढकलले गेले, तर पुढचे बुकिंग घेता येणार नाही. त्यामुळे नुकसान तर होणार आहेच, असेही ते म्हणाले. कॅ टरिंगची आॅर्डर १५ दिवस आधी देत असल्याने ते नुकसान टाळता आले आहे.विजय देववाणी म्हणाले की, कोरोनामुळे हॉल, कॅटरर्स यांचे किती नुकसान होईल, याबाबत आताच काही माहिती देता येणार नाही. एप्रिलमध्ये १५ तारखेनंतर लग्नसोहळे आणि साखरपुड्यासाठी बुकिंग आहे.वाय.जी. भुस्कु णे म्हणाले की, लग्नसराईचे बुकिंग १५ एप्रिलनंतर आहे. दूरच्या गावांवरून येणारी पाहुणेमंडळी लग्नाला यायला तयार होणार नाहीत. त्यामुळे कॅटरिंग व्यवसायाला नक्कीच फटका बसेल. एखाद्या कार्यक्रमाचे बुकिंग केल्यावर तो रद्द केला, तर अनामत रक्कम परत केली जात नाही. पण, आताचे कारण सबळ असल्याने पैसे द्यावे लागतील.कॅटरिंग व्यवसायातील राजेंद्र कामतेकर म्हणाले की, आमच्या दोन कार्यक्रमांच्या आॅर्डर रद्द झाल्याने आम्हाला ७० ते ८० हजार रुपयांचे नुकसान सहन करावे लागणार आहे.लग्न, साखरपुडे या सोहळ्यांच्या आॅर्डर्स पुढे ढकलल्या आहेत, तर घरगुती समारंभाच्या आॅर्डर्स रद्द झाल्या आहेत.- सचिन जांभळे, कॅटरिंग व्यावसायिकलग्न समारंभाच्या सोडून सोसायटी, घरगुती कार्यक्रम, साखरपुडा समारंभांच्या सगळ्या आॅर्डर्स रद्द झालेल्या आहेत. काहींनी समारंभाच्या तारखा बदलल्या आहेत.- कैलाश होतचंदानी, कॅटरिंग व्यावसायिक
Coronavirus :‘शुभमंगल सावधान’देखील कोरोनामुळे लांबले, सभागृहमालकांचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2020 1:36 AM