कल्याण - कल्याणची रहिवासी असलेली महिला दुबई प्रवास करुन कल्याणला परतल्याने तिला तिच्या घरातच वैद्यकीय निरिक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. वैद्यकीय तपासणीपश्चात तिच्यामध्ये कोरोनाची लक्षणो आढळून आली नसली तरी आणखीन १४ दिवस वैद्यकीय निरिक्षणाखाली ठेवले जाणार असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी दिली आहे.
दुबई प्रवास करुन आलेल्या प्रवाशांची लिस्ट राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून पाठविण्यात आली. त्यामध्ये या प्रवासी महिलेचे नाव होते. २३ फेब्रुवारी रोजी ती दुबई येथील आबू दाबी याठिकाणी गेली होती. पाच दिवसांनी पुन्हा ती भारतात कल्याणच्या घरी पोहचली. राज्य सरकारने महापालिकेस प्रवाशांची यादी पाठविल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाने तिच्या घरी धाव घेतली. त्या महिलेची प्राथमिक तपासणी केली. तिच्या कोरोनाची लागण झाल्याचे एकही लक्षण आढळून आलेले नाही.
coronavirus : काेराेनाचा पुण्यातील आयटी कंपन्यांना धसका ; अनेक ऑफीस केले बंद
कोरोनाच्या धसक्याने शेकडो कोंबड्या रस्त्यावर फेकल्या
corona virus-कोरोनाचा पर्यटनावर परिणाम : देशांतर्गतचे प्रवासही स्थानिकांनी केले रद्द
coronavirus : काेराेनामुळे पुणे विद्यापीठाने महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली ?
ही महिला वयोवृद्ध असून तिच्या दोन्ही मुली परदेशात आहे. घरी एकटीच आहे. तिच्या लक्षणोच दिसून आलेली नाहीत तर पुढील उपचारासाठी तिला कस्तुरबा रुग्णालयात पाठविता येत नाही. तिला लागणच झालेली नसल्याने तिला तिच्या घरीच आणखीन १४ दिवस निरिक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. आरोग्य पथकाने ती राहत असलेल्या सोसायटीत कोरोनापासून बचाव करण्यासाठी काय काळजी घ्यावी याचे प्रशिक्षण दिले आहे. त्यामुळे नागरीकांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहेत.