शहरं
Join us  
Trending Stories
1
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
2
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
3
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
4
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
5
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
6
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
8
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
9
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
10
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योग गुरूंनीच सांगितलं...
11
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
12
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
13
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
14
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
15
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
16
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
17
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
18
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
19
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
20
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा

उल्हासनगरात अतिधोकादायक इमारतींवर महानगरपालिकेची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 11:58 PM

भिवंडीच्या दुर्घटनेतून बोध : १५0 धोकादायक इमारतींची यादी तयार, ३0 इमारती केल्या खाली, पाडकामाला सुरुवात केल्याने खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : महापालिकेने १५० धोकादायक इमारतींची यादी पावसाळ्यापूर्वीच जाहीर केली असून भिवंडीतील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने कारवाई करण्याचे ठरवले आहे. अतिधोकादायक ३० इमारती रिकाम्या केल्या आहेत. त्यापैकी हमलोग, शांती पॅलेस, ओम शिवगंगा इमारतींवर अतिक्रमण विभागाने गुरुवारपासून पाडकाम सुरू केल्याची माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली.उल्हासनगरमध्ये दरवर्षी इमारती कोसळून अनेकांचे बळी गेले आहेत. भिवंडी येथील धोकादायक इमारत कोसळून ४० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला असून असंख्य जखमी झाले आहेत. त्यापार्श्वभूमीवर उपायुक्त मदन सोंडे यांनी कॅम्प नं-१ मधील हमलोग, कॅम्प नं-२ मधील शांती पॅलेस व कॅम्प नं-४ मधील ओम शिवगंगा या अतिधोकादायक इमारती जमीनदोस्त करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या पथकाने तिन्ही इमारतींवर कारवाई सुरू केली आहे. धोकादायक इमारतींच्या यादीत नसलेल्या अन्य इमारतींचे सर्वेक्षण करणार असल्याचे सोंडे यांनी सांगितले.शहरातील अतिधोकादायक इमारती जमीनदोस्त करण्याची कारवाई महापालिकेने सुरू केली. तर, दुसरीकडे १३० धोकादायक इमारतींना पावसाळ्यापूर्वी नोटिसा देऊन नागरिकांना इमारती रिकाम्या करण्यास सांगितले होते. मात्र, रहिवाशांना पर्यायी जागा उपलब्ध नसल्याने त्यांच्यावर जीव मुठीत घेऊन राहण्याची वेळ आली आहे.धोकादायक इमारतींची संख्या वाढणारशहरात १९९० ते ९५ दरम्यान रेतीपुरवठा बंद असल्याने, त्यावेळी बांधण्यात आलेल्या बहुतांश इमारतींमध्ये रेतीऐवजी दगडांचा चुरा व वाळवा रेती यांचा वापर करीत होते. त्याकाळातील बहुतांश इमारती धोकादायक होत असल्याने त्यांचे नव्याने सर्वेक्षण करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे धोकादायक इमारतींची संख्या वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.