शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

भाईंदर पुर्वेला कमी पाणी पुरवठा केला जात असल्याने नगरसेवक आक्रमक; आयुक्त घेणार बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 4:06 PM

"शहरातील नागरिकांमध्ये पाणी वाटपात भेदभाव करणे संतापजनक असून सत्ताधारी भाजपसह पालिका प्रशासन मात्र पाणी वाटपात भेदभाव करत आहे."

मीरारोड - भाईंदर पश्चिमेच्या तुलनेत भाईंदर पूर्वला कमी पाणी दिले जात असल्याने शहरातील नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून पाणी देण्यात केला जाणारा भेदभाव तत्काळ दूर करावा. तत्काळ समान पाणी वाटप करावे, अशी मागणी शिवसेना नगरसेवकांनी केली आहे. (The corporator is aggressive as there is less water supply to Bhayander East)

भाईंदर पूर्व भागातील शिवसेना नगरसेवक तथा विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील, गटनेत्या नीलम ढवण, तारा घरत, दिनेश नलावडे, धनेश पाटील, वंदना पाटील, जयंतीलाल पाटील, अनंत शिर्के, स्नेहा पांडे, कुसुम गुप्ता, संध्या पाटील आदींनी आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह आयुक्त दिलीप ढोले यांची मंगळवारी भेट घेतली. 

यावेळी नगरसेवकांनी भाईंदर पूर्व भागात पाणी नेहमीच कमी येत असल्याच्या आरोपांचा पुनरुच्चार केला. या भागात दाट वस्ती असताना देखील पाणी मात्र कमी मिळते. पाण्याचा दाब कमी असतो. 

शटडाऊन झाल्यास दोन ते तीन दिवस पाणी येत नाही. मिळते तेसुद्धा अतिशय कमी दाबाने येते. त्यामुळे नागरिकांना सतत पाणी टंचाई सहन करावी लागत आहे. गेल्या काही वर्षांपासून नगरसेवक म्हणून आम्ही सातत्याने महापालिकेस अर्ज विनंत्या करून देखील पालिकेने प्रश्न सोडवण्यास टाळाटाळ चालवल्याचा आरोप प्रवीण पाटील यांनी केला. 

शहरातील नागरिकांमध्ये पाणी वाटपात भेदभाव करणे संतापजनक असून सत्ताधारी भाजपसह पालिका प्रशासन मात्र पाणी वाटपात भेदभाव करत आहे, असे दिनेश नलावडे यांनी केला आहे. भाईंदर पूर्वेचा पाणि प्रश्न गंभीर असून जनता संतप्त आहे. यामुळे तत्काळ समान पाणी वाटप देऊन हा प्रश्न सोडवा, अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे. 

यासंदर्भात बोलताना आयुक्त दिलीप ढोले म्हणाले, पालिकेचा समान पाणी वाटपचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी १७ कोटींचा खर्च होणार आहे. तर पाण्यासाठी तुमची स्वतंत्र बैठक घेऊ, असे आश्वासन आयुक्तांनी दिले. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरbhayandarभाइंदरWaterपाणीMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक