शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
5
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
6
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
7
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

नगरसेवकांचे केरळ पूरग्रस्तांना एक महिन्याचे मानधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 3:50 AM

केरळ पूरग्रस्तांसाठी पक्षाच्या नगरसेवकांचे एका महिन्याचे मानधन देण्याचा निर्णय शिवसेनेने घेताच, इतर पक्षांच्या नगरसेवकांनीही मानधन देण्याचे घोषित केले.

उल्हासनगर : केरळ पूरग्रस्तांसाठी पक्षाच्या नगरसेवकांचे एका महिन्याचे मानधन देण्याचा निर्णय शिवसेनेने घेताच, इतर पक्षांच्या नगरसेवकांनीही मानधन देण्याचे घोषित केले. आमदार ज्योती कलानी यांनी त्यांचे एक महिन्याचे मानधन देण्याचे जाहीर केले असून महापालिकाही आर्थिक मदत करणार असल्याचे संकेत आयुक्तांनी दिले.शहरातील सामाजिक संस्था, व्यापारी आदींनी केरळातील पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला. त्यापाठोपाठ शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे व पक्षाचे गटनेते रमेश चव्हाण यांनी पक्षाच्या २५ नगरसेवकांचे एका महिन्याचे मानधन केरळ पूरग्रस्तांना देण्याचे दोन दिवसांपूर्वी जाहीर केले. सोमवारी महासभा सुरू होताच, दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहून महासभा स्थगित करण्यात आली. यावेळी अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले. त्यापूर्वी सर्वच पक्षांच्या गटनेत्यांनी केरळ पूरग्रस्तांना एका महिन्याचे मानधन देण्याचे पत्र पालिका सचिवाकडे दिले. महापालिकेकडून आर्थिक आणि इतर मदतही करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले.प्रल्हाद म्हात्रेंचे एक लाखाचे अर्थसाहाय्यडोंबिवली : केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी डोंबिवलीतील युवा युथ फाउंडेशनने सुमारे तीन टन विविध साहित्य जमा केले. हे धान्य, साहित्य केरळपर्यंत पोहोचवण्यासाठी मनसेचे शहर संघटक प्रल्हाद म्हात्रे यांनी एक लाख रुपये रोख रक्कम दिली. दरम्यान, सोमवारी हे साहित्य रवाना झाले असून ते मंगळवारी केरळमध्ये पोहोचणार आहे. केरळमधील पूरग्रस्तांना मदत म्हणून युवा युथ फाउंडेशनने जीवनावश्यक वस्तू व सामान देण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. फाउंडेशनने त्यासाठी ठाकुर्ली व डोंबिवली येथे दोन संकलन केंद्रे सुरू केली. नागरिकांनी शनिवार आणि रविवारी तेथे तीन टन सामान जमा केले. परंतु, ते केरळमध्ये पोहोचवण्यासाठी ९० हजार खर्च येणार होता. त्यासाठी निधी गोळा करण्याचा पेच युवकांसमोर होता. मात्र, म्हात्रे यांनी एक लाख रुपये देत फाउंडेशनला मदतीचा हात दिला. केरळची परिस्थिती कोणावरही येऊ शकते. त्यासाठी देशभरातून मदतीचे हात पुढे येत आहेत. त्यातच आपलाही खारीचा वाटा असावा, यासाठी सामाजिक बांधीलकी म्हणून अर्थसाहाय्य केल्याचे म्हात्रे म्हणाले.भाजपातर्फे केरळला २५ लाखांची मदतडोंबिवली : केरळमधील पूरग्रस्तांना मदतीचा हात म्हणून भाजपाच्या कल्याण जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कल्याण-डोंबिवलीतील नगरसेवकांनी पुढे यावे, असे आवाहन राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले. दरम्यान, चव्हाण यांनीही त्यांचे महिन्याचे दोन लाख १३ हजारांचे मानधन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दिल्याचे जाहीर केले.सावरकर रोड येथील चव्हाण यांच्या जाणता राजा कार्यालयात शुक्रवारी केरळ समाजासमवेत बैठक झाली. कल्याण-डोंबिवलीतील भाजपाचे नगरसेवक आणि आपण दिलेला निधी, असे एकूण २५ लाखांचे अर्थसाहाय्य केरळसाठी दिले जाणार आहे. डोंबिवलीतील नागरिकांनीही ‘सेवा भारती केरलम’ यांना साहाय्य करावे, असे आवाहन यावेळी चव्हाण यांनी केले. दरम्यान, खासदार श्रीकांत शिंदे यांनीही त्यांचे महिन्याचे एक लाखाचे मानधन केरळ सरकारच्या मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देणार असल्याचे स्पष्ट केले.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरKerala Floodsकेरळ पूर