अंबरनाथ - गेली कित्तेक वर्ष पडीक अवस्थेत असलेल्या अंबरनाथमधील शूटींग रेंज पुन्हा सुरु करण्याचे प्रयत्न्न पालिकेने सुरु केले आहे. या शूटींग रेंजचे भूमीपुजन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रायफलचा वापर करुन पालकमंत्र्यांनी अजुन निशाना साधला. सलग दोन वेळा अचूक निशाना साधत या शूटींग रेंजचे भूमीपुजन झाल्याचे जाहिर केले. अंबरनाथ विम्को नाका पसिरात अंबरनाथ पालिकेचे शुटींग रेंज होते. मात्र या शूटींग रेंजचे 1998 पासुन बंद अवस्थेते होते. या शूटींग रेंजचे वापर होत नसल्याने ही जागा पडीक अवस्थेत गेली होती. या ठिकाणी शुटींग रेंज पुन्हा सुरु करण्यासाठी सुचिता देसाई यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. अखेर पालिकेने सव्वा कोटींचा प्रकल्प आराखडा तयार करीत या कामाला मंजुरी दिली. या शूटींग रेंजच्या जागेची स्वच्छता करुन त्या ठिकाणी नव्याने शूटींग रेंज सुरु करण्यात येणार आहे. या कामाचे भूमीपुजन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अंबरनाथमधील राजकीय पुढारी विकास कामांसाठी एकत्रित कसे येतात हे चित्र पाहण्यासाठी इतर राजकारण्यांनी अंबरनाथमध्ये यावे. विकासाच्या मुद्यावर अंबरनाथकर एकत्रित येतात ही चांगली बाब आहे. या पुढे देखील वेगाने शहरातील प्रकल्प पूर्ण करण्याचे आवाहन शिंदे यांनी केले. अंबरनाथ शहरात जे उपक्रम सुरु आहेत त्या उपक्रमांमुळे अंबरनाथ शहर हे जिल्ह्यातील महत्वाचे शहर म्हणून पुढे येत आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. खासदार शिंदे यांच्या पुढकारातुन हा प्रकल्प मुर्त स्वरुप घेत असुन येत्या 10 महिन्यात ते काम पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शूटींग रेंजसोबत नेताजी मैदानाचेही भूमीपुजन शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या मैदानाचे सपाटीकरन करुन लवकरच त्या मैदानाचेही काम सुरु करण्यात येणार असल्याचे खासदार डॉ. शिंदे यांनी सांगितले. शूटींग रेंजच्या भूमीपुजनाच्या वेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील हातात रायफल घेतली. समोरील अचुक निशाना साधत पालकमंत्र्यांनी देखील शूटींगचा अनुभव घेतला. पालककमंत्र्यांचा निशाना अचुक लागताच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी देखील हातात रायफल घेत अचुक निशाना साधत शूटींचा आनंद घेतला. या कार्यक्रमाला नगराध्यक्षा मनिषा वाळेकर, अब्दुल शेख, कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, आमदार डॉ बालाजी किणीकर, प्रदिप पाटील, सदाशिव पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.