ठाणे - घोडबंदर भागात उभारलेल्या थीम पार्क (जुने ठाणे नवीन ठाणे) च्या कामात भ्रष्टाचार झाल्याचे पुरावे गुरुवारी झालेल्या महासभेत राष्टÑवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला आणि सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी सादर केले. त्यानंतर, प्रशासनाने या आरोपात तथ्य असल्याचे सांगितले. त्यानुसार, याच्या चौकशीसाठी आयुक्त, माजी महापौर, नजीब मुल्ला, आॅडिटर यांची समिती नेमण्याचा ठराव करून दोषी ठरणाऱ्या अधिकाºयावर कारवाई केली जाणार आहे.सभागृह नेते नरेश म्हस्के आणि नजीब मुल्ला यांनी या विषयाला हात घातला. मुल्लांनी तर पुरावेच सादर केले. येथील ट्रेनसाठी एक कोटी ६५ लाख, महाराजांच्या पुतळ्यासाठी ८० लाख, जमीन खोदण्यासाठी पाच कोटी असे पुरावे त्यांनी सादर करून भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. वास्तविक पाहता हे काम दोन कोटींचेही नसताना त्यावर १६ कोटी ३२ लाखांचा खर्च झालाच कसा, यासाठीचा निधी कोणत्या हेडमधून खर्च केला, असे प्रश्न विचारून सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी प्रशासनाला अडचणीत आणले. चौकशी होईपर्यंत दोषी अधिकाºयाला निलंबित करावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी केली.हे काम पूर्ण होऊन सहा महिने झाले नसतानाही आता लगेच देखभालीची निविदा काढली कशी, असा सवाल नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी केला. त्यात उद्यान विभागाने किती कामांचे बिल अदा केले, असा सवाल करून मुल्ला यांनी अधिकाºयांना बोलावले. त्यावर उद्यान विभागाचे अधिकारी केदार पाटील यांनी बॉलिवूड पार्क आणि थीम पार्कचे उद्यान विभागाकडे ३६ लाखांचे बिल सादर झाले होते. परंतु, त्याची तपासणी केली असता ते केवळ दोन लाख ५० हजारांचेच असल्याचे स्पष्ट झाले, त्यामुळे ते अदा केले नसल्याचे स्पष्ट केले.या स्पष्टीकरणानंतर यात भ्रष्टाचार झाल्याचे स्पष्ट झाल्याने संबंधित अधिकाºयांवर कारवाईची मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली. त्यानुसार, याची चौकशीसाठी उपरोक्तसमिती नेमून चौकशी करून दोषी अधिकाºयांना निलंबित करावे, आतापर्यंत ठेकेदाराला जेवढी बिले अदा केली असतील, ती संबंधित अधिकाºयांच्या पगारातून कापून घ्यावीत, असा ठराव यावेळी नरेश म्हस्के यांनी सभागृहासमोर मांडला. त्यांच्या ठरावाला विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी अनुमोदन दिले.खर्च वसूल करणारथीम पार्कमधील भ्रष्टाचाराचा विषय सभागृहात गाजल्यानंतर महापौर मीनाक्षी शिंदे यांनी याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले. संबंधित अधिकाºयांवर कारवाई करावी तसेच त्यांच्याकडून झालेला खर्च वसूल करावा, असे आदेशही त्यांनी दिले.
थीम पार्कच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचे प्रशासनाने केले मान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 2:20 AM