कल्याण : येथील जोशी बागेत राहणारे गणेश परदेशी यांनी शैलेंद्र जयस्वाल आणि बिंदू जयस्वाल या पती पत्नीस १० लाख रुपये व्यापारासाठी दिले होते. घेतलेले पैसे व्यापारातील ५० टक्के नफ्यासह परत करण्याचे जयस्वाल यांनी सांगितले होते. मूळ रक्कम आणि नफा परत न केल्याने परदेशी यांच्या तक्रारीच्या आधारे जयस्वाल पती पत्नीच्याविरोधात महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
------------
३० लाखांची फसवणूक
कल्याण : नेतिवली येथील मेट्रो रेसिडेन्सीत राहणारे शिवशंकर साहू यांना बलराज शेट्टी यांनी भागिदारीतील व्यवसाय सुरू करण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी साहू यांना बँकेतून कर्ज काढण्यास सांगितले. या कर्जाची रक्कम शेट्टी यांनी साहू यांच्याकडून घेतली. यातून शेट्टी यांनी ९ लाख रुपयांची जमीन खरेदी करुन उर्वरित रकमेचा अपहार केला. हा प्रकार २०१८ ते २०२१ दरम्यान घडला. साहू यांनी पैसे परत मागितल्यास साहू यांचे अपहरण करून त्यांच्या आई वडिल आणि भाऊ यांना जिवे ठार मारण्याची धमकी शेट्टी यांनी दिली होती. अशा प्रकारे ३० लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली खडकपाडा पोलीस ठाण्यात शेट्टी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
------------------------