मुंब्राः कथित जमिनीच्या वादातून दाम्प्त्याने त्यांच्या लहान मुलीसह आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. शिवराम आणि दीपिका पाटील तसंच त्यांची मुलगी अनुष्का यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार जवळील वाकलन परिसरात वास्तव्यास होते. तिघांच्या आत्महत्येची माहिती पसरताच परिसरात एकच खळबळ उडाली.पाटील यांनी आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहिली. ती चिठ्ठी त्यांनी नातेवाईकांच्या व्हॉट्सअप नंबरवर व्हायरल केली होती. जवळच्या 13 नातेवाईकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं त्यांनी चिठ्ठीत नमूद केलं आहे. या नातेवाईकांना कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणीदेखील त्यांनी चिठ्ठीतून केली आहे. तिघांच्या आत्महत्येच्या नेमक्या कारणाची माहिती पोलिसांकडून अद्याप मिळालेली नाही.'कुटुंबातील इतर लोकांना त्रास देण्यासाठी आम्ही आत्महत्या करत आहोत. आमच्या आत्महत्येसाठी घरातील सगळ्यांना जबाबदार धरावं' असा मजकूर असलेली चिठ्ठी लिहून शिवराम आणि दीपिका पाटील आणि त्यांची मुलगी अनुष्का यांनी गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. आपल्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्या १३ जणांना कठोर शिक्षा व्हावी हीच आमची शेवटची इच्छा असल्याचं त्यांनी चिठ्ठीत नमूद केलं आहे. सध्या पोलीस संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. पोलिसांनी चिठ्ठी ताब्यात घेतली असून त्यात नावं नमूद असलेल्या १३ जणांना लवकरच चौकशीसाठी ताब्यात घेतलं जाण्याची शक्यता आहे. पोलिसांनी पती, पत्नी आणि मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलीस सध्या संपूर्ण घराची झडती घेत असून शेजाऱ्यांचीदेखील चौकशी करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, चिठ्ठीमध्ये मालमत्ता आणि संपत्तीचा उल्लेख करण्यात आला आहे. त्या अनुषंगानं पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
व्हॉट्स अॅपवर शेवटची इच्छा शेअर करत दाम्पत्याचा चिमुरडीसह गळफास; परिसरात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2020 1:22 PM
आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत १३ जणांची नावं; चिठ्ठी व्हॉट्स व्हॉट्स अॅपवर व्हायरल
ठळक मुद्देआत्महत्येपूर्वी दाम्पत्यानं लिहिलेल्या चिठ्ठीत १३ नातेवाईकांची नावंआत्महत्येसाठी नातेवाईकांना जबाबदार धरत कठोर कारवाईची मागणीपोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले; तपास सुरू