शहरं
Join us  
Trending Stories
1
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
2
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
3
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
4
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
5
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
7
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
8
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
9
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
10
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
11
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
12
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
13
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
14
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
15
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
16
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
17
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
18
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
19
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
20
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा

कोर्टाची फाइट, बारमालक ‘टाइट’

By admin | Published: April 01, 2017 11:43 PM

दारू पिऊन वाहन चालवल्याने होणारे अपघात टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार ठाणे जिल्ह्यातील तब्बल ९०३ बार, पब बंद होणार आहेत. त्यांना सील ठोकण्याची कारवाई सुरू झाली आहे.

ठाणे : दारू पिऊन वाहन चालवल्याने होणारे अपघात टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार ठाणे जिल्ह्यातील तब्बल ९०३ बार, पब बंद होणार आहेत. त्यांना सील ठोकण्याची कारवाई सुरू झाली आहे.या निर्णयामुळे १०० टक्के महसुलावर परिणाम होणार आहे. उत्पादन शुल्क विभागामार्फत देण्यात येणाऱ्या परवान्यांतून मिळणाऱ्या महसुलावर त्याचा परिणाम होईल, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ठाणे अधीक्षक एन.एन. पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने जिल्ह्यात कारवाई सुरू झाली आहे. पण,ही कारवाई सुरू करण्यापूर्वीच राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील काही बारमालक व वाइनशॉपमालकांनी आपली दुकाने बंद ठेवली आहेत. आता जिल्ह्यातील एकूण ९०३ दुकानांवर शासकीय सील ठोकण्याची कारवाई हाती घेण्यात आली आहे. या बंदीच्या निर्णयामुळे जिल्ह्याच्या उत्पन्नावर नव्हे, तर राज्याच्या महसुलावर परिणाम होणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी क रताना अडथळे येण्याचे काही कारण नाही, असेही पाटील यांनी स्पष्ट केले आहे.जिल्ह्यात राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांचे जाळे मुंबई असो वा गुजरात व इतर राज्यांत जाण्यासाठी ठाणे जिल्ह्याशिवाय पर्याय नाही. या जिल्ह्यातून जवळपास पाच राष्ट्रीय, तर पाच राज्य महामार्गांचे जाळे पसरले असून यातील किती राज्य महामार्ग बंद होतील, हे संबंधित विभागच सांगू शकेल.पण, सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचा नक्की जिल्ह्यासह ठाणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील अपघात कमी होण्यास फायदा होईल, अशी माहिती ठाणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप पालवे यांनी दिली. मात्र, या दारूबंदीचा फायदा शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात नक्की होईल.त्यामुळे ठाणे शहर पोलीस आयुक्तालयासह ग्रामीण भागात होणाऱ्या अपघातांची संख्या कमी होण्यास मदत होईल. असेही पालवे यांनी स्पष्ट केले. मिळणार किंवा कसे, याबाबतचे हे विषय वाहतूक विभागांतर्गत येत नसल्याने त्याबाबत बोलणे उचित नाही. (प्रतिनिधी)