जितेंद्र कालेकरलोकमत न्यूज नेटवर्कठाणे: तब्बल दोन हजार कोटींच्या इफेड्रीन प्रकरणात सह आरोपी असलेल्या अभिनेत्री ममता कुलकर्णीने आपली गोठवलेली बँक खाती पुन्हा खुली करण्यास ठाणे विशेष न्यायालयाकडे मागणी केली होती. तिचा हा अर्ज ठाणे न्यायालयाने सोमवारी फेटाळला असून बँक खाती आणि तिच्या सदनिका खुल्या करण्यासही विरोध दर्शविल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाणे विशेष सत्र न्यायालयात अभिनेत्री ममता हिच्या वकीलांनी दिलेल्या अर्जात म्हटले आहे की, २०१६ मध्ये चुकीने तिचे इफे ड्रीन प्रकरणात नाव गोवले गेले आहे. तिच्या कुटूंबात ती एकमेव कमवती आहे. तिच्या एका बहिणीवर नवी मुंबईतील पनवेल येथील एका केंद्रावर गेल्या आठ वर्षांपासून उपचार सुरु आहेत. तिची सर्व बँक खाती आणि ठेवी या न्यायालयाच्या आदेशाने पोलिसांनी गोठविल्या आहेत. बँक खाती गोठवल्यामुळे बहिणीच्या वैद्यकीय उपचारांसाठी औषधे तसेच इतर खर्च करणेही आपल्याला शक्य होत नाही. याच बहिणीला चांगल्या स्वच्छ निरोगी वातावरणात ठेवण्यासाठी मुंबईच्या अंधेरीतील दोन सदनिकाही खुल्या केल्या जाव्यात, अशी मागणी तिने ठाणे न्यायालयात एक महिन्यापूर्वी दिलेल्या अर्जात केली आहे. हाच अर्ज २ आॅगस्ट २०२१ रोजी ठाणे न्यायालयाने फेटाळून या गुन्हयाची तीव्रता मोठी असल्याने तसेच इफेड्रीन सारख्या प्रकरणात आरोपी असूनही ममता स्वत: हजर झालेली नाही. त्यामुळे बँक खाती आणि तिच्या अंधेरीतील दोन्ही सदनिका पुन्हा खुल्या करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे ममताला सध्या तरी आपली बँक खाती कायदेशीररित्या खुली होण्याची आणखी वाट पहावी लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.* काय होते प्रकरण?कथित ड्रग माफिया विकी गोस्वामीला कोटयवधी रुपयांच्या इफेड्रीनची देशविदेशात तस्करी करण्यासाठी मदत केल्याचा आरोप अभिनेत्री ममता हिच्यावर आहे. त्यामुळेच तिची भारतातील सर्व बँक खाती जुलै २०१६ मध्ये गोठविली आहेत. त्यावेळी तिच्या बँक खात्यात ८० ते ९० लाखांची रक्कम जमा होती. विकीसह ममता, डॉ. अब्दुल्ला अशा चौघांविरुद्ध रेड कॉर्नरची नोटीसही बजावण्यात आली होती.* विकी गोस्वामी आणि एव्हॉनचा संचालक मनोज जैन यांच्याबरोबर ८ जानेवारी २०१६ रोजी झालेल्या बैठकीत ममता सामील झाल्याचे पोलिसांना पुरावे मिळाले होते. त्यानंतरच तिच्या बँक खात्यांची चौकशी पोलिसांनी केली.* यात एका खात्यातून विकीची बहिण रिटाच्या खात्यामध्ये दोन कोटी रुपये वळते झाले आहेत. त्यावरुनच रिटाचीही पोलिसांनी चौकशी केली होती. तिनेही आपल्यावरील आरोपांचा इन्कार करीत केवळ चांगली मैत्रिण असल्यामुळेच व्यवसायासाठी आपल्याला ममताने हे पैसे दिल्याचा दावा केला होता.* असा आहे ममताच्या बँक खात्यांचा तपशील-पोलिसांच्या दाव्यानुसार ममताची मडापो (भूज, गुजरात), कालवाड रोड (राजकोट, गुजरात), बदलापूर (ठाणे , महाराष्टÑ) येथील अॅक्सिस बँकांच्या शाखांमध्ये २६ लाखांची रोकड आहे. तर मालाड मुंबईच्या शाखेत एक लाख अमेरिकन डॉलर्स (६७ लाख रुपये भारतीय चलन) अशी सुमारे ९३ लाखांची रक्कम २०१६ मध्ये होती. हीच खाती सील असल्यामुळे ममता किंवा तिच्या नातेवाईकांना तिथून पैशांचे व्यवहार करता येत नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ममता कुलकर्णीची गोठविलेली बँक खाती खुली करण्यास न्यायालयाचा नकार
By जितेंद्र कालेकर | Published: August 05, 2021 12:46 AM
विकी गोस्वामी आणि एव्हॉनचा संचालक मनोज जैन यांच्याबरोबर ८ जानेवारी २०१६ रोजी झालेल्या बैठकीत ममता सामील झाल्याचे पोलिसांना पुरावे मिळाले होते. त्यानंतरच तिच्या बँक खात्यांची चौकशी पोलिसांनी केली. कथित ड्रग माफिया विकी गोस्वामीला कोटयवधी रुपयांच्या इफेड्रीनची देशविदेशात तस्करी करण्यासाठी मदत केल्याचा आरोप अभिनेत्री ममता हिच्यावर आहे.
ठळक मुद्देममता कुलकर्णीची गोठविलेली बँक खाती खुली करण्यास न्यायालयाचा नकारठाण्याच्या विशेष न्यायालयाने फेटाळला अर्जदोन हजार कोटींचे इफेड्रीन प्रकरण