लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कोविड १९ लसीकरणाच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून शुक्र वारी ठाणे महानगरपालिकेच्या घोडबंदर रोडवरील रोझा गार्डनिया आरोग्य केंद्रावर कोविड १९ लसीकरणाचा ड्राय रन होणार आहे. महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या उपस्थितीत हा ड्राय रन होणार आहे. याआधी परस्पर आरोग्य अधिकाऱ्यांनी या ड्राय रनचे आयोजन केल्यामुळे ते गुंडाळण्याची नामूष्की प्रशासनावर आली होती. आता या याठिकाणी लसीकरणासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्याची माहिती पालिकेने दिली.यामध्ये लसीकरणासाठी येणाºया लाभार्थ्यांसाठी प्रतिक्षा कक्ष, नोंदणी कक्ष आणि लसीकरण कक्ष आदी सुविधा राहणार आहेत. त्याचबरोबर लसीकरण झाल्यानंतर निरीक्षण कक्षाचीही निर्मिती केली आहे. या ड्राय रनसाठी रोझा गार्डनिया आरोग्य केंद्रावर काम करणाºया २५ कर्मचाऱ्यांची निवड केली आहेत. दरम्यान, लसीकरण करण्यात येणाºया सर्व लाभार्थ्यांची माहिती केंद्र शासनाच्या को-विन या अॅपवर अद्ययावत केली आहे. यामध्ये आरोग्य कर्मचारी, डॉक्टर्स आणि प्रत्यक्ष फिल्डवर काम करणाºया कर्मचाºयांचा समावेश असल्याची माहिती पालिकेने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात दिली आहे.