शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

भाजपा सरकारविरोधात उद्यापासून पालघरसह ठाण्यात माकपचा ठिय्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2018 8:10 PM

सात तालुक्यांमध्ये माकपचं ठिय्या आंदोलन

ठाणे: उद्यापासून ठाणे-पालघरमधील सात तालुक्यांमध्ये भाजपा सरकारविरोधात माकपाकडून ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. यामध्ये 50 हजार लोक सहभागी होणार असल्याचा दावा पक्षाकडून करण्यात आला आहे. हुतात्मा दिन आणि कॉ. गोदावरी परुळेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त हे आंदोलन करण्यात येणार आहे. यामध्ये किसान सभा, सीटू, जनवादी महिला संघटना, डीवायएफआय व एसएफआय या संघटना सहभागी होणार आहेत.शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे बुलेट ट्रेन, एक्सप्रेस हायवे आणि नदीजोड सारखे प्रकल्प ताबडतोब रद्द करा, वनजमिनी, वरकस जमिनी, देवस्थान व गायरान जमिनी कसणाऱ्यांच्या नावे करा, जिल्ह्यातील धरणांचे पाणी स्थानिक जनतेला पिण्यासाठी आणि शेतीसाठी प्राधान्याने द्या; दुष्काळ, रेशन, रोजगार, शिक्षण, पेन्शन, वीज, आरोग्य, घरकुले, रस्ते, गावठाण विस्तार असे स्थानिक प्रश्न ताबडतोब सोडवा, या मागण्यांसाठी हे ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. प्रशासनाकडून मागण्या होईपर्यंत आंदोलन मागे घेतलं जाणार नसल्याचा पवित्रा माकपनं घेतला आहे. भाजपा सरकारच्या धोरणांमुळे प्रचंड प्रमाणात वाढलेले पेट्रोल, डिझेल, गॅस व इतर जीवनावश्यक वस्तूंचे जीवघेणे भाव; भयानक प्रमाणात वाढलेली बेरोजगारी, दारिद्र्य, कर्जबाजारीपणा व कुपोषण; राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीवरुन होत असलेले आरोप, वशिलेबाज भांडवलशाही; देशात पेटवण्यात येत असलेले धर्मांधन्ध व जातपातवादी वातावरण या मुद्द्यांवरही आंदोलनाच्या माध्यमातून लोकांमध्ये प्रखर जनजागृती केली जाणार आहे.या आंदोलनाचे ठिकठिकाणचे नेतृत्व पक्षाचे केंद्रीय कमिटी सदस्य व अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, पक्षाचे ज्येष्ठ नेते एल. बी. धनगर व माजी खासदार लहानू कोम, पक्षाचे राज्य सचिवमंडळ सदस्य बारक्या मांगात व किसन गुजर, पक्षाचे राज्य कमिटी सदस्य रतन बुधर, रडका कलांगडा, सुनील धानवा, किरण गहला, लहानी दौडा, विनोद निकोले व लक्ष्मण डोंबरे, पक्षाचे जिल्हा सचिवमंडळ सदस्य एडवर्ड वरठा, यशवंत घाटाळ, भारत वळंबा, सुदाम धिंडा व प्राची हातिवलेकर, तलासरी पंचायत समितीच्या सभापती सविता डावरे व उपसभापती वनशा दुमाडा, तलासरीच्या नगराध्यक्षा स्मिता वळवी व उपनगराध्यक्ष सुरेश भोये, पक्षाच्या जिल्हा व तालुका कमिट्याचे सदस्य, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचे सदस्य आणि अनेक गावचे सरपंच व उपसरपंच हे करणार आहेत. 

टॅग्स :BJPभाजपाagitationआंदोलनDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNarendra Modiनरेंद्र मोदी