सचिन सागरे कल्याण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चलनातून पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा बाद केल्यानंतर कॅशलेस व्यवहारांकडे नागरिकांनी वाटचाल करावी, अशी अपेक्षा असताना सायबर गुन्हेगारांनी नागरिकांच्या एटीएम कार्डाचे पिन क्रमांक मिळवून फसवणुकीचा सपाटा लावला आहे. सायबर गुन्हे शाखेकडील अशा तक्रारींचा ओघ नोटाबंदीनंतर वाढला आहे. दररोज किमान एक अशी याबाबतचे गुन्हे दाखल होण्याची सरासरी आहे.पेट्रोलपंप, मॉल, हॉटेल, दुकाने अशा ठिकाणी बिल भरण्यासाठी डेबिट अथवा क्रेडिट कार्ड दिले जाते. ग्राहक कार्डाद्वारे व्यवहार करताना पिन क्रमांक टाकतात. त्याचे क्लोनिंग करण्याची व्यवस्था हॅकर्सनी शोधून काढली आहे. कार्डचे क्लोनिंग केल्यावर तुमचा खाते क्र मांक, पिन क्र मांक आदी गुप्त माहिती चोरली जाते. मग ग्राहकांना बँकेकडून बोलतो आहे, असे सांगूत फोन केला जातो. तुमची माहिती अपडेट करायची असल्याचे सांगत बँक खाते क्र मांक, पिन क्र मांक आदी माहिती विचारली जाते. ही माहिती दिल्यावर काही मिनिटांतच आपल्या खात्यावरील पैसे काढून घेतले जातात.कल्याण पश्चिमेतील सिद्धेश्वर आळी परिसरात राहणारे निनाद झारे यांंच्या एटीएम कार्डचे क्लोनिंग करुन त्यांच्या बचत खात्यातून २० हजार रुपये काढून घेतले. डोंबिवली पश्चिमेतील गुप्ते रोड परिसरात राहणाºया प्रल्हाद पाटील (६७) या ज्येष्ठ नागरिकाच्या एटीएम कार्डचा डाटा हॅक करून परस्पर ५० हजार रुपये काढून घेण्यात आले. ठाकुरवाडी परिसरात राहणाºया शक्ती पिल्लाई यांच्या खात्यातून चाळीस हजार रु पये लंपास करण्यात आले. डोंबिवली पूर्वेतील कासाबेला इमारतीमध्ये राहणाºया लक्ष्मीकांत बुगडे यांंच्या क्रेडिट कार्डचा वापर करुन ३४ हजार ४८४ रुपयांची खरेदी करून त्यांची फसवणूक केली.बँक आवारात भित्तीपत्रक-बँक ग्राहकांकडून क्रेडिट, डेबिट कार्डची माहिती फोनवर घेतली जात नाही.अनोळखी व्यक्तीने क्र ेडिट कार्ड नंबर, सीव्हीसी नंबर, कार्ड मुदत संपण्याची तारीख याबाबत विचारल्यास ती देऊ नका, अशी भित्तीपत्रके बँकांनी आवारात पोलिसांच्या सूचनेनंतर लावली.
क्रेडिट, डेबिट कार्डांंवर आली हॅकर्सची संक्रांत! पोलिसांचा दावा : दररोज किमान एक गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 2:31 AM