शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

शिवसेना-भाजपाच्या श्रेयवादाने आयुक्त जात्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 1:00 AM

नवीन ठाणे स्टेशन, क्लस्टर डेव्हलपमेंट आणि जलवाहतूक हे प्रकल्प विधानसभा निवडणुकीपूर्वी मार्गी लावण्याकरिता संजीव

ठाणे : नवीन ठाणे स्टेशन, क्लस्टर डेव्हलपमेंट आणि जलवाहतूक हे प्रकल्प विधानसभा निवडणुकीपूर्वी मार्गी लावण्याकरिता संजीव जयस्वाल हेच ठाणे महापालिका आयुक्तपदी राहावे, याकरिता खुद्द पालकमंत्री एकनाथ शिंदे प्रयत्नशील असून वरचेवर आपल्या बदलीची भाषा करणाऱ्या जयस्वाल यांचीही हे प्रकल्प सुरू करून पदावरून दूर होण्याची इच्छा आहे. त्यामुळे महापौर मीनाक्षी शिंदे व आयुक्त जयस्वाल यांच्यातील सध्याच्या वादंगात पुन्हा पालकमंत्री मध्यस्थी करतील, असे संकेत प्राप्त होत आहेत.महासभेच्या निमित्ताने सुरू झालेल्या महापौर आणि आयुक्त यांच्यातील वादावर येत्या दोन ते तीन दिवसांत पडदा पडण्याची चिन्हे आहेत. वरकरणी हा वाद महापौरांविरुद्ध आयुक्त, शिवसेनाविरुद्ध आयुक्त असा भासत असला, तरी प्रत्यक्षात हे ठाण्यात होऊ घातलेल्या कामांचे श्रेय घेण्यावरून शिवसेना-भाजपात सुरू असलेला वाद आहे. जसजशा निवडणुका जवळ येतील, तसतसा हा वाद अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला भाजपाला सर करायचा असेल, तर येथे होणाºया कामांचे श्रेय आपले असल्याचे भाजपाला लोकांच्या मनावर ठसवावे लागेल. आयुक्त हा सरकारचा प्रतिनिधी असतो. त्यामुळे सत्ताधारी भाजपा कामांचे श्रेय शिवसेनेला मिळू नये, याकरिता आयुक्तांवर दबाव टाकत आहे, तर शिवसेना आयुक्तांना लक्ष्य करून भाजपाला कामांचे श्रेय मिळणार नाही, याकरिता धडपड करत आहे. प्रत्यक्षात ही कामे मार्गी लागेपर्यंत शिंदे यांना जयस्वाल यांची बदली होऊ नये, असे वाटत आहे. कारण, नवीन व्यक्ती पदावर आल्यास सुरू केलेल्या कामांची गती मंदावण्याची व कदाचित प्रस्तावित प्रकल्पांना फाटे फुटण्याची भीती शिंदे यांना वाटते.राज्य विधिमंडळाचे अधिवेशन संपल्यावर लागलीच आयुक्त आणि पालकमंत्री यांच्यात पुन्हा चर्चा होऊन या वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे. मागील आठवड्यात झालेल्या महासभेत रेंटलच्या घराच्या मुद्यावरून महापौरांनी टीकेची झोड उठवली होती. त्यानंतर, अधिकाºयांनी दुसºया दिवशीच्या महासभेला गैरहजर राहून याचा वचपा काढला होता. हा वाद एवढ्यावरच थांबला नाही, तर महापौरांनी थेट आयुक्तांवर तोफ डागल्याने आयुक्त उद्विग्न झाले. अगोदर भाजपाने तर आता शिवसेनेने आयुक्तांना खिंडीत गाठले आहे.भाजपातील काही मंडळींनी आयुक्तांविरुद्ध सुरू केलेली मोहीम मंत्रालयात मुख्यमंत्र्यांकडील बैठकीत आमदार संजय केळकर यांच्या मध्यस्थीनंतर थांबली, तर आता महापौर मीनाक्षी शिंदे यांनी उचल खाल्ली. काही दिवसांपूर्वी महापौर शिंदे व आयुक्त यांच्यातील वादात पालकमंत्री शिंदे यांनी मध्यस्थी केली होती. त्यामुळे महापौर असो की भाजपाचे नगरसेवकही, या वादात शिवसेना, भाजपाच्या नेत्यांकडून वापरली जाणारी प्यादी असून प्रत्यक्षात मूळ लढाई ही शिवसेना-भाजपातील श्रेयाची आहे. मागील दोन वर्षांपासून शहरात होत असलेल्या विविध विकासकामांंमुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पालकमंत्री शिंदे यांनी आयुक्तांचे तोंडभरून कौतुक केले आहे. असे असतानाही महापौरांनी केलेली टीका आयुक्तांच्या मनाला लागली आहे.