स्मशानभूमीच्या प्रवेशद्वारावर आंदोलन छेडले होते. त्याची दखल घेऊन प्रशासनाने अखेर ती दुरुस्त केली आहे.
------------------------------------
कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला लस द्या
कल्याण : केडीएमटी उपक्रमातील आतापर्यंत ९० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून, सहा जणांना आपल्या प्राणास मुकावे लागले आहे. कर्मचारी कोरोनाने बाधित झाल्यास त्याच्या कुटुंबालादेखील संक्रमणाचा धोका असतो. त्यामुळे उपक्रमातील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचे प्राधान्याने लसीकरण व्हावे, अशी मागणी कल्याण- डोंबिवली महानगरपालिका परिवहन मजदूर युनियनने मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे पत्रद्वारे केली आहे.
---------------------------------------
गतिरोधक बसवावेत
डोंबिवली : ठाकुर्ली ९० फिट रोडवर डांबरीकरणाचे काम मार्गी लागले असून, भरधाव वेगात जाणारी वाहने पाहता गतिरोधकाअभावी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे येथील मॅकस्वेल केमिस्ट, ओंकार स्कूल, सर्वाेदय हिल या चौकांमध्ये गतिरोधक बसविण्यात यावेत, अशी मागणी शिवसेनेचे उपशहर संघटक तथा केडीएमसी माजी परिवहन सदस्य दीपक भोसले यांनी मनपाच्या बांधकाम विभागाकडे केली आहे.
--------------------------------------
लसीकरण केंद्र वाढवा
डोंबिवली : केडीएमसी परिक्षेत्रात कोरोना रुग्णांची वाढणारी संख्या पाहता कल्याणप्रमाणे डोंबिवलीतही १८ ते ४४ वयोगटासाठी लस देणे सुरू करण्यात यावे, अशी मागणी डोंबिवली शहर ब्लॉक काँग्रेस पूर्व कमिटीचे उपाध्यक्ष प्रणव केणे यांनी मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
----------------------------------------