सदानंद नाईक
उल्हासनगर : शहरातील श्रीराम चौक व जव्हार हॉटेलच्या रूम मधून वर्ल्डकपच्या इंग्लंड विरुद्ध श्रीलंका संघा दरम्यान खेळला जाणाऱ्या क्रिकेट बॅटिंगचा पर्दापाश् ठाणे खंडणी विरोधी पथकाने केला. याप्रकरणी छत्तीसगड येथे राहणाऱ्या दिनेशकुमार टेकवानी यांच्यावर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली.
उल्हासनगर क्रिकेट बॅटिंगचे केंद्र राहिले असून वर्ल्डकप क्रिकेट सामन्या दरम्यान क्रिकेट बॅटिंगचे गुन्हे शहरात दाखल होतात. असा यापूर्वीचा पूर्व इतिहास राहिला आहे. छत्तीसगड येथे राहणारा दिनेशकुमार लक्ष्मणदास माखिजा यांनी विलासपूर येथील मनीष पिंजानी, चिराग व रायपूर येथे राहणारा चिराग अश्या ३ इसमा सोबत संगनमत करून मोबाईल मध्ये बनावट ओळखपत्र बनवून खरे असल्याचे भासविले. त्या ओळ्खपत्राद्वारे वर्ल्डकॅपच्या क्रिकेट सामन्यावर ८ ऑक्टोबर पासून ऑनलाईन क्रिकेट बॅटिंग घेत असल्याचे ठाणे खंडणी विरोधी पथकाला आढळून आले. तसेच २६ ऑक्टोबर रोजीच्या इंग्लंड विरुद्ध श्रीलंका संघा दरम्यान झालेल्या क्रिकेट सामन्यावर ऑनलाईन क्रिकेट बॅटिंग घेतांना आढळून आले.
क्रिकेट बुकीं दिनेशकुमार माखिजा याने सहकार्याच्या संगनमतातून बनावट सिमकार्ड वरून बनावट वेबसाईटवर बनावट आयडी तयार करून स्वतःच्या आर्थिक क्रिकेट बेटिंगसट्टा खेळत असल्याचे उघड झाले. याप्रकरणी ठाणे खंडणी विरोधी पथकाने दिनेशकुमार माखिजा यांच्या विरोधात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली. क्रिकेटसट्टा मध्ये शहरातील नामांकित गुंतले आहेत का? यादिशेने पोलीस अधिक तपास करीत आहेत. यापूर्वी शहरात क्रिकेट सट्टा प्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत. शहरातील विविध भागात असे क्रिकेट सट्टा खेळले जात असल्याचे बोलले जात असून स्थानिक पोलिसांना क्रिकेट सट्टा प्रकरणी साधी भन्नक का नाही?. असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.