भार्इंदर : तोदिवाडी येथील जमिनीचा जबरदस्तीने ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याबद्दल १ सप्टेंबर रोजी भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता आणि इतर ३५ ते ४० जणांवर जमीनमालक श्यामसुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीवरून भार्इंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र महिना उलटला तरी त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने पोलिसांवर राजकीय दबाव आणला जात आहे का, असा सवाल तक्रारदार श्यामसुंदर अग्रवाल यांनी केला आहे.तोदिवाडीतील सुमारे सात एकर जमिनीची मालकी आणि ताबा श्यामसुंदर अग्रवाल यांच्याकडे असून तसे फलकही लावलेले होते. नरेंद्र मेहता हे माजी नगरसेवक प्रशांत केळुस्कर, संजय थरथरे व त्यांच्या ३० ते ४० साथीदारांनी १सप्टेंबर रोजी जबरदस्तीने या जमिनीचा ताबा घेतला होता. तेथील सुरक्षारक्षकांनाही त्यांनी जबर मारहाण केली होती. या प्रकरणाची माहिती मिळताच गणपती विसर्जन व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी आलेले पोलीस अधीक्षक शिवाजी राठोड, अपर पोलीस अधीक्षक संजय पाटील यांच्यासह पोलीस फौजफाटा घेऊन घटनास्थळी पोहचले. यावेळी तेथे असलेल्या जमावाला पोलिसांनी पिटाळले. याबाबत भार्इंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. नरेंद्र मेहता पोलिसांवर राजकीय दबाव आणत असल्याने त्यांच्यावर कोणतीही ठोस कारवाई होत नाही, असा आरोप श्यामसुंदर अग्रवाल यांनी केला आहे. हा गुन्हा दाखल झाल्याच्या दुसऱ्या दिवशी नरेंद्र मेहता यांनीही श्यामसुंदर अग्रवाल यांच्याविरुद्ध तक्रार केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जबरदस्ती घेतली जमीनतोदिवाडीतील सुमारे सात एकर जमिनीची मालकी आणि ताबा श्यामसुंदर अग्रवाल यांच्याकडे असून तसे फलकही लावलेले होते. नरेंद्र मेहता हे माजी नगरसेवक, प्रशांत केळुस्कर, संजय थरथरे व त्यांच्या ३० ते ४० साथीदारांनी १ सप्टेंबर रोजी जबरदस्तीने या जमिनीचा ताबा घेतला होता. अहवाल केंद्रस्थानी ठेवून जामीन अर्जावर युक्तिवाद केला.
माजी आमदारावर गुन्हा; कारवाई मात्र नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2020 1:44 AM