लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाणाचे चिन्ह आणि शिवसेना हे नाव एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर ठाकरे गटातून खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली. त्याविरोधात ठाण्यातील शिवसेना महिला आघाडी आक्रमक झाली आहे. त्यानंतर खासदार राऊत यांच्याविरुद्ध ठाणेनगर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संविधानिक पदावर असतानाही खासदार राऊत यांनी त्यांच्याविषयी अपमानजनक तसेच आक्षेपार्ह वक्तव्ये केल्याची तक्रार ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी रविवारी ठाणेनगर पोलिस ठाण्यात दाखल केली. याप्रकरणी चौकशी सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयराज रणवरे यांनी दिली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"