शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
2
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
3
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
4
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
5
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
6
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
7
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
8
"काम करणारा भाऊ पाहिजे की, ### बनवणारी...", स्नेहल जगतापांबद्दल गोगावलेंचं वादग्रस्त विधान
9
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
10
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
11
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
12
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
13
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
14
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
15
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
16
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
17
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी
18
पीएम सूर्य घर योजनेंतर्गत सोलर पॅनेल बसवायचंय? 'या' नंबरवर मिळेल सर्व माहिती
19
काँग्रेसच्या 'पंजा'ला बांधलेला वाघ अन् शिंदेंनी सोडला बाण; 'दसरा मेळावा' टीझरमध्ये ठाकरे निशाण्यावर
20
"संजय राऊत, आता शिंग फुटली तर..."; राज ठाकरेंच्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना इशारा

मीरा-भाईंदर महापालिकेच्या दोन कार्यकारी अभियंत्यांवर कांदळवन ऱ्हासप्रकरणी गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 4:23 AM

मीरारोड : मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश आणि कायदे-नियमांचे उल्लंघन मीरा-भाईंदर महापालिकेकडून सातत्याने सुरूच आहे. कांदळवन क्षेत्रात बेकायदेशीरपणे जमीनमालकांना ...

मीरारोड : मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश आणि कायदे-नियमांचे उल्लंघन मीरा-भाईंदर महापालिकेकडून सातत्याने सुरूच आहे. कांदळवन क्षेत्रात बेकायदेशीरपणे जमीनमालकांना टीडीआर मिळावा म्हणून कोट्यवधी रुपयांच्या नाल्यांचे कंत्राट दिल्याच्या तक्रारीवरून महापालिकेचे कार्यकारी अभियंता दीपक खांबित व सुरेश वाकोडेंसह ठेकेदार आणि संबंधित अधिकारी यांच्यावर मंडळ अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर मीरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे .

पावसाळी पाण्याचा निचरा होण्याच्या नावाखाली महापालिकेने शहरात २२ नाल्यांचे तब्बल ९५ कोटींचे बांधकामाचे कंत्राट एकट्या मे. आर अँड बी इन्फ्रास्ट्रक्चर या ठेकेदारास पालिकेने दिले आहे. या ठेकेदाराच्या काम निकृष्ट असल्याच्या तक्रारी असतानाच काही ठिकाणी उपकंत्राटदार काम करत असल्याचे आरोप आहेत; तर कांदळवनात नाल्यांची बांधकामे केल्याने ती थांबवून गुन्हा दाखल करण्याची मागणी सातत्याने होत होती.

मीरारोडच्या नेमिनाथ हाईट्स व हाटकेश येथील पाण्याच्या टाकी मागील परिसरात कांदळवन क्षेत्रात महापालिकेने दोन नाल्यांचे बांधकाम चालवले होते. नेमिनाथ हाईट्स मागील नैसर्गिक नाल्याचा प्रवाह बंद करून पालिकेने आणखी एक नाला बांधण्यास घेतला होता. या ठिकाणी कोणताच नाला नव्हता. तर पाण्याच्या टाकीमागील नालासुद्धा मूळ नैसर्गिक नाला खुला करून तो घोडबंदर खाडीला न जोडताच हा प्रकार पालिकेने चालवला होता. ठेकेदारांना आर्थिक फायदा करून देण्यासह जमीनमालकांना टीडीआर तसेच आजूबाजूच्या विकासकांना फायदा करून देण्यासाठी हा घाट घातल्याच्या तक्रारी नागरिकांनी चालवल्या आहेत. याप्रकरणी स्थानिक जागरुक नागरिक असलेल्या रूपाली श्रीवास्तव यांनी सातत्याने तक्रारी चालवल्या होत्या. मीरा-भाईंदर स्तरावरील कांदळवन समितीने या दोन्ही परिसराची पाहणी करून कांदळवन क्षेत्राचा ऱ्हास व उच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करून पालिकेने भराव व बांधकाम केल्याचा अहवाल दिला होता. समितीच्या पाहणीवेळी पालिकेचे अधिकारी नरेंद्र चव्हाणसुद्धा उपस्थित होते. त्यामुळे त्यांना दोन्ही कामे बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तरीसुद्धा महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. विजय राठोडसह शहर अभियंता शिवाजी बारकुंड, कार्यकारी अभियंता दीपक खांबित व सुरेश वाकोडे, कनिष्ठ अभियंता चेतन म्हात्रे व ठेकेदार यांनी नाल्यांचे बेकायदेशीर बांधकाम सुरूच ठेवले. पोलिसांनी अनेकवेळा काम बंद करूनसुद्धा पोलिसांच्या नाकावर टिच्चून महापालिकेने काम चालूच ठेवले.

वन विभागासह समितीच्या अहवालानंतर अखेर अपर तहसीलदार नंदकिशोर देशमुख यांच्या मंजुरीनंतर मंडल अधिकारी प्रशांत कापडे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने मीरारोड पोलिसांनी खांबित व वाकोडे, ठेकेदार, संबंधित अधिकारी आणि वाहन यंत्र साहित्याचे चालक- मालक आदींवर पर्यावरण संरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे महापालिका अधिकारी व ठेकेदार यांच्या या आधीसुद्धा पर्यावरण ऱ्हासाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. तर अनेक तक्रारी अजूनही प्रलंबित आहेत.