शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीतून मोठी आऊटगोईंग?; प्रश्न विचारताच अजित पवार भडकले, खंबीर असल्याचं सांगत म्हणाले...
2
महाराष्ट्रात कोण असेल महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा? देवेंद्र फडणवीसांनी दिले सूचक संकेत
3
“आम्ही ठरवले आहे की पुन्हा सत्तेत आल्यास बहि‍णींना ३ हजार देणार”; शिंदे गटातील नेत्याचा शब्द
4
दुसऱ्यांदा विमान बॉम्बने उडवण्याची धमकी, अकासा एअरच्या प्लेनचे दिल्लीत इमर्जन्सी लँडिंग
5
२ तास ३५ मिनिटं घाबरवलं; डिजिटल अरेस्ट करून वृद्धाला २८ लाखांचा गंडा, एक कॉल अन्...
6
जम्मू काश्मीरमध्ये बिघडला 'इंडिया' आघाडीचा खेळ; सत्तास्थापनेत काँग्रेस बाहेर
7
UPI पेमेंट सर्व्हिस लवकरच ५० नवीन ॲप्सवर मिळणार, NPCI कडून मोठी घोषणा
8
भारताला वर्ल्ड कप जिंकवून देणारा कोच आता मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात, अखेर घरवापसी झाली
9
Stock Market Today: आयटी, ऑटो शेअरनं खराब केला शेअर बाजाराचा मूड; Sensex-Nifty मध्ये घसरण
10
पोलीस असल्याचे सांगून रिक्षात तरुणीला अटक; सुटकेसाठी मागितले ५० हजार,VIDEO सुरु करताच...
11
"लाडकी बहीण योजनेला कोणी टच करायला गेला, तर...", मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल
12
Reliance Industries च्या शेअर्समध्ये होतेय घसरण, बोनस शेअर्स देण्यात RIL का करतेय उशीर?
13
"…हे महायुती सरकारचं रिपोर्ट कार्ड नव्हे तर डिपोर्ट कार्ड", आदित्य ठाकरेंचा खोचक टोला
14
“विधानसभा लढवणार, जिंकणार अन् सत्ता आणणार”; राज ठाकरेंचा निर्धार, युतीबाबत म्हणाले...
15
काँग्रेसची शेवटच्या क्षणी माघार; J&K मध्ये ओमर सरकारला बाहेरुन पाठिंबा देणार, कारण काय ?
16
हरमनप्रीत कौरला भारताच्या कर्णधारपदावरुन काढून टाकण्याची हीच ती वेळ? वाचा
17
घसरणीनंतर पुन्हा सोन्याच्या किंमतीत तेजी, चांदीच्या किंमतीत १४०० रुपयांपेक्षा अधिक वाढ; पटापट चेक करा
18
IND vs NZ 1st Test Day 1: पावसामुळे पहिला दिवस गेला वाया; कसर भरून काढण्यासाठी असा ठरलाय दुसऱ्या दिवसाचा प्लान
19
ओमर अब्दुल्लांचे मोठी राजकीय खेळी; जम्मूतील हिंदू आमदाराला बनवले उपमुख्यमंत्री
20
"चाकणकरांच्या बाबतीत तत्परता दाखवली, मग माझ्याबाबतीत का..."; अजित पवार गटातील नेत्याची उघड नाराजी

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, मजुराला सात वर्षांची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 4:29 AM

बांधकामाच्या ठिकाणी शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणा-या २२ वर्षीय गणेश वाढोळे या मजुराला ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एच.एम. पटवर्धन यांनी २० डिसेंबर रोजी सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.

ठाणे : बांधकामाच्या ठिकाणी शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणा-या २२ वर्षीय गणेश वाढोळे या मजुराला ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एच.एम. पटवर्धन यांनी २० डिसेंबर रोजी सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. सरकारी वकील म्हणून जिल्हा मुख्य सरकारी वकील संजय लोंढे यांनी काम पाहिले.बुलडाणा येथील आरोपी वाढोळे हा नवघर परिसरात बांधकामाच्या ठिकाणी काम करून तिथेच राहत होता. येथे पीडित मुलगी कुटुंबासोबत राहत होती. या कुटुंबीयांशी आरोपीची ओळख होती. त्याने ७ सप्टेंबर २०१६ रोजी पहाटेच्या सुमारास पीडित मुलीला घरी बोलवून घेतले होते. आली नाहीस तर अत्याचार करण्याची धमकीही त्याने दिली. ती घरात आल्यावर त्याने तिच्यावर अत्याचार केला. तिने झालेला प्रकार पालकांना सांगितला असता, त्याच्याविरोधात तिच्या पालकांनी नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, भादंवि ३७६ आणि पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायाधीश पटवर्धन यांच्या न्यायालयासमोर हे प्रकरण अंतिम सुनावणीसाठी आले. सरकारी वकील लोंढे यांनी पीडितेसह १५ साक्षीदारांची साक्ष आणि परिस्थितीजन्य पुरावे सादर केले. ते पुरावे ग्राह्यमानून आरोपी गणेशला न्यायालयाने दोषी ठरवले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी