शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

Crime News: व्हॉट्सएप डीपी वर ओळखीच्या फोटोमुळे फसवणूक

By धीरज परब | Published: February 15, 2023 4:13 PM

Crime News: ओळखीच्या व्यक्तीचा व्हॉट्स ऍप डीपीवर  फोटो लावून २० हजार रुपये उकळणाऱ्या अनोळखी व्यक्ती विरोधात भाईंदरच्या नवघर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मीरारोड - ओळखीच्या व्यक्तीचा व्हॉट्स ऍप डीपीवर  फोटो लावून २० हजार रुपये उकळणाऱ्या अनोळखी व्यक्ती विरोधात भाईंदरच्या नवघर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

भाईंदरच्या आरएनपी पार्क मध्ये राहणारे देवकीनंदन मोदी यांनी अंधेरीच्या भरत बिष्णोई यांना डायरी बनवण्याचे काम दिले होते . मोदी यांना व्हॉट्सएप डीपी वर भरतचा फोटो असलेल्या क्रमांकावरून संदेश आला कि , आपण अडचणीत असून २० हजार रुपयांची गरज आहे व सायंकाळी परत देतो. मोदी यांनी बँक खाते क्रमांक मागितला असता समोरच्या व्यक्तीने व्हॉट्सअप वरच बँक खात्याचा क्रमांक व आयएफसी कोड पाठवला . मोदी यांच्या खात्यात तेवढी रक्कम नसल्याने त्यांनी  त्यांचा भाचा हेमंत अग्रवाल ह्याला पैसे पाठवण्यास सांगितले . हेमंत यांनी मामाने दिलेल्या खाते क्रमांकावर २० हजार रुपये पाठवले.

त्या नंतर पुन्हा त्या व्हॉट्सअप वरून मोदी यांना मॅसेज आला कि , पत्नी आजारी असल्याने आणखी २० हजार रुपये हवे आहेत . मोदी यांनी त्यांच्या कडे असलेल्या भरतच्या क्रमांकावर कॉल केला असता भरत यांनी आपला मोबाईल हॅक झाला असून पैसे पाठवू नका असे सांगितले . भरत यांचा फोटो डीपीवर ठेऊन व्हॉट्सअप द्वारे आपली फसवणूक केल्याचे लक्षात आल्यावर मोदी यांनी नवघर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावर पोलिसांनी १३ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल केला आहे .

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीWhatsAppव्हॉट्सअ‍ॅप