लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : नविन कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी ठाणे पोलिसांनी रात्री ११ ते सकाळी ६ दरम्यान संचालबंदी लागू केली आहे. असे असूनही खुलेआमपणे पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करणाºया लालू यादव (२४, रा. आनंदनगर, कोपरी, ठाणे) याच्यासह तिघांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच साथ प्रतिबंधक कायद्यांतर्गत कोपरी पोलिसांनी मंगळवारी रात्री गुन्हा दाखल केला आहे.परदेशामध्ये कोरोना विषाणूपेक्षा ७० टक्के घातक कोरोनाचा नविन संसर्ग वेगाने फैलावत असल्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात रात्री ११ ते सकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी संचारबंदी लागू केली आहे. या काळात विनाकारण फिरणाऱ्यांवर कलम १८८ अन्वये कारवाई केली जाणार आहे. ठाणे पूर्व भागातील मैत्री बारच्या समोर २२ डिसेंबर रोजी रात्री ११.१५ वाजण्याच्या सुमारास लालू यादव हा पाणीपुरीची विक्री करीत होता. तर कोपरीतील अपना ज्वेलर्सच्या दुकानासमोर मोहम्मद रियाद सिद्धीकी (२९) हा मांसाहारी पदार्थांची विक्री करीत असल्याचे मंगळवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास आढळला. त्याचवेळी देवेंद्र कदम (४८) हा देखिल चायनीज पदार्थांची विक्री करीत असल्याचे आढळले. या तिघांविरुद्ध वरिष्ठ पोलीस निरीक्षक ममता डिसुझा यांच्या पथकाने गुन्हा दाखल केल्याची माहिती कोपरी पोलिसांनी दिली..........................................
संचारबंदीमध्ये पानीपुरी विक्री करणाऱ्यासह तिघांविरुद्ध गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 6:06 PM
ठाणे पोलिसांनी रात्री ११ ते सकाळी ६ दरम्यान संचालबंदी लागू केली आहे. असे असूनही खुलेआमपणे पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करणाºया लालू यादव (२४, रा. आनंदनगर, कोपरी, ठाणे) याच्यासह तिघांविरुद्ध साथ प्रतिबंधक कायद्यांतर्गत कोपरी पोलिसांनी मंगळवारी रात्री गुन्हा दाखल केला आहे.
ठळक मुद्दे कोपरी पोलिसांची कार्यवाही