शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
4
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
5
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
6
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
7
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
8
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
9
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
10
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
11
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
12
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
13
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
14
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
15
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
16
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
17
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
18
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
19
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
20
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!

भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, फसवणूक कलमांखाली नोंदले गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2021 4:38 AM

लोकमत न्यूज नेटवर्क मीरारोड : मीरा रोडच्या वादग्रस्त ७११ क्लबवरील गुन्ह्याचा तपास स्थानिक पोलिसांकडून काढून घेऊन मुंबई पोलिसांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मीरारोड : मीरा रोडच्या वादग्रस्त ७११ क्लबवरील गुन्ह्याचा तपास स्थानिक पोलिसांकडून काढून घेऊन मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे दिल्यानंतर तपास वेगाने होऊ लागला आहे. आर्थिक गुन्हे शाखेने सदर गुन्ह्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यासह फसवणूक, बनावटगिरीची कलमे लावली आहेत. परिणामी, माजी आमदार नरेंद्र मेहतांसह काही बड्या धेंडांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मेहता व अन्य काही मंडळींनी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.

मीरारोडच्या कनकीया भागात नाविकास क्षेत्रात कांदळवन व पाणथळ नष्ट करून कांदळवनापासूनच्या ५० मीटर बफर झोन क्षेत्रात तसेच सीआरझेडचे उल्लंघन करून ७११ क्लब व तारांकित हॉटेल उभारण्यात आल्याच्या तक्रारी आहेत. २०१० पासून पर्यावरण संरक्षण आणि एमआरटीपीअंतर्गत अनेक गुन्हे दाखल आहेत. पालिकेच्या विकास नियंत्रण नियमावलीचे सर्रास उल्लंघन करून मेहतांच्या सेव्हन इलेव्हन हॉटेल्स कंपनीला नियमबाह्य परवानग्या देण्यात आल्याच्या तक्रारी आहेत.

अनोंदणीकृत मुखत्यारपत्राच्या आधारे बांधकाम परवानग्या देताना येथे कोणताच राष्ट्रीय वा राज्य महामार्ग नसतानाही अतिरिक्त एक चटईक्षेत्र देण्यात आले. ३० मीटर रुंद रस्त्यापासून ३० मीटर खोली पर्यंतच रहिवास वापर करता येत असला तरी तेथे केवळ स्टील्टसहित तळ अधिक एक मजल्याची इमारत बांधता येत असताना येथे तळघर, तळ अधिक चार मजली इमारत बांधण्याची परवानगी देण्यात आली आहे.

राज्याच्या नगररचना विभागाच्या संचालकांनी दोनवेळा या जागेवरील प्रस्ताव नामंजूर केले होते. मीरा भाईंदरसह मुंबई उपनगर भागात वीजपुरवठा करणाऱ्या २२० केव्ही अतिउच्चदाबाच्या केबल व टॉवरखाली बांधकाम करत निर्देशांचे उल्लंघन केल्याच्या तक्रारी आहेत. असे असतानासुद्धा पालिकेने मेहतांच्या कंपनीस बांधकाम परवानगी आणि भोगवटा दाखला दिला. इतकेच नव्हे, तर अतिरिक्त एक चटईक्षेत्र देता यावे म्हणून, झोन बदलण्याचा ठराव महासभेत मंजूर केला.

त्यातच गेल्या महिन्यात मंजूर केलेल्या नकाशापेक्षा अधिक बांधकाम सीआरझेड व अन्य क्षेत्रांत बेकायदेशीरपणे केले म्हणून पालिकेच्या नगररचना विभागाने प्रभाग समिती क्रमांक ४ च्या प्रभाग अधिकारी कांचन गायकवाड यांना कारवाई करण्यास कळविले.

सप्टेंबर २०१९ मध्ये मीरारोड पोलीस ठाण्यात मेहतांसह तत्कालीन पालिका आयुक्त बालाजी खतगावकर, महापालिकेचे संबंधित अधिकारी व सेव्हन इलेव्हन हॉटेल्सचे भागधारक, संचालक आदींवर गुन्हा दाखल झाला. हा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त शशिकांत भोसले यांना देण्यात आला. परंतु, भोसले यांनी गेल्या सव्वावर्षात काटेकोर तपास केला नाही. शिवाय, आवश्यक ती कायद्याची कलमे लावली नाहीत, असा आरोप होत आहे. जानेवारीमध्ये शासनाने सदर गुन्ह्याचा तपास भोसलेंकडून काढून घेऊन आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविला. उपायुक्त निकेत कौशिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मंदार लाड व पथकाने वेगाने तपास सुरू केला.

दरम्यान, स्थानिक पोलिसांकडून तपास काढून घेऊन तो मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्याच्या सरकारच्या निर्णयाविरुद्ध मेहता तसेच प्रशांत केळुस्कर, संजय सुर्वे आदींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. परंतु, अजून तरी त्यांना दिलासा मिळालेला नाही.

.............

वाचली