ठाणे : शहरातील सोसायट्यांनी कचºयावर शास्त्रोक्त प्रक्रिया करावी यासाठी पालिकेने विविध प्रकारची जनजागृती केली. तरीही शहरातील १ हजारपैकी केवळ १५० सोसायट्यांनीच आतापर्यंत कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी पावले उचलली आहेत. यामध्ये १०० जुन्या सोसायट्या असून नव्याने त्यात ५० सोसायट्यांची भर पडली आहे. यामुळे पालिकेने सोसायटीधारकांना पुन्हा महिनाभराची मुदत दिली असून या काळात कचºयाची विल्हेवाट न लावल्यास संबंधित सोसायट्यांवर गुन्हे दाखल करण्याचे संकेत पालिकेने दिले आहेत.केंद्र शासनाच्या अधिसुचनेनंतर ठाणे महापालिकेने मागील सहा महिन्यांपासून कचºयाची विल्हेवाट न लावणाºया सोसायट्यांना नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे. परंतु,अद्यापही त्यांच्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे महापालिकेने मागील महिन्यात पुन्हा या सोसायट्यांना नोटिसा पाठविल्या. त्यानंतर यामध्ये पुन्हा पावसाळ्याचे कारण पुढे करून एक पाऊल मागे घेऊन एक महिन्याची मुदतवाढ दिली. पालिकेच्या प्रयत्नांमुळे सहा महिन्यात ५० सोसायट्यांनी कचºयाची शास्त्रोक्त विल्हेवाटीसाठी पावले उचलली आहेत. तर जुन्या १०० सोसायट्यांनी यापूर्वीच कचरा विल्हेवाटीसाठीची केंद्र उभी केली आहेत. आता मुदतवाढीनंतरही नियम न पाळणाºया सोसायट्यांचा कचरा न उचलण्याचा पालिकेचा निर्धार आहे. त्यातही ज्या सोसायटीधारकांनी कचºयाच्या विल्हेवाट लावण्यासाठी हालचाली सुरू केल्या असतील त्यांना आठ ते दहा दिवसांची मुदत देण्याचा विचार पालिकेचा आहे. परंतु, ज्या सोसायट्यांकडून जराही हालचाली झाल्या नसतील त्यांच्याविरोधात घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ नुसार गुन्हा दाखल करण्याचा इशारा पालिकेने दिला आहे.
कचऱ्याची विल्हेवाट न लावल्यास गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 3:14 AM