शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
3
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
4
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
5
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
6
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
7
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
9
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
10
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
11
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
12
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
13
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
14
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
16
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
17
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
18
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
19
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
20
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!

गुन्हेगारांची चित्रफीत पोलिसांच्या रडारवर, समाजमाध्यमांमध्ये गुन्हेगारीचे उदात्तीकरण  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 4:37 AM

समाजमाध्यमांच्या मदतीने गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणारी चित्रफीत ठाण्यात व्हायरल झाली आहे. ठाण्यातील १० कुख्यात आरोपींची वजनदार राजकीय नेत्यांसोबतची छायाचित्रे असलेली ही चित्रफीत आता पोलिसांच्या रडारवर आली आहे. १० कुख्यात आरोपींचे मोठ्या नेत्यांप्रमाणे सादरीकरण करणारी चित्रफीत गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांमध्ये फिरत आहे. या चित्रफितीमध्ये उतरत्या क्रमाने १० आरोपींची छायाचित्रे आहेत.

ठाणे : समाजमाध्यमांच्या मदतीने गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणारी चित्रफीत ठाण्यात व्हायरल झाली आहे. ठाण्यातील १० कुख्यात आरोपींची वजनदार राजकीय नेत्यांसोबतची छायाचित्रे असलेली ही चित्रफीत आता पोलिसांच्या रडारवर आली आहे.१० कुख्यात आरोपींचे मोठ्या नेत्यांप्रमाणे सादरीकरण करणारी चित्रफीत गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांमध्ये फिरत आहे. या चित्रफितीमध्ये उतरत्या क्रमाने १० आरोपींची छायाचित्रे आहेत.नौपाडा, राबोडी आणि कळवा पोलीस ठाण्यांत ९ गुन्हे दाखल असलेला आणि सध्या कारागृहात असलेला नौपाड्यातील शिवाजी ऊर्फ शिवा ठाकूर या चित्रफितीमध्ये दहाव्या स्थानावर आहे. राबोडी आणि नौपाडा पोलीस ठाण्यात ३ गुन्हे दाखल असलेला पाचपाखाडी येथील मनीष जाधव नवव्या स्थानावर असून तो सध्या कारागृहात आहे. ९ गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेला आणि सध्या जामिनावर असलेला आरोपी मयूर शिंदे आठव्या, तर ठाणेनगर पोलीस ठाण्यात ८ गुन्हे दाखल असलेला आणि सध्या कारागृहात असलेला रविचंद ठाकूर ऊर्फ राजा ठाकूर सातव्या स्थानावर आहे. त्यापाठोपाठ जामिनावर बाहेर असलेल्या भांडुप येथील अमित मधुकर भोगले, नवी मुंबई येथील अन्नू ऊर्फ किशोर शैलेंद्र आंग्रे, वागळे इस्टेट येथील राजेंद्र मच्छिंद्र परदेशी ऊर्फ बारक्या, भिवंडी येथील सुजित ऊर्फ तात्या मधुकर पाटील यांची ठाण्यातील नेत्यांसोबतची छायाचित्रे चित्रफितीमध्ये झळकतात. या चित्रफितीनुसार तेलीगल्ली येथील राजेश भालचंद्र गवारी ऊर्फ राजाभाऊ गवारी हा ठाण्यातील दुसºया क्रमांकाचा डॉन असून पहिल्या क्रमांकावर सिद्धेश बाळा म्हसकर ऊर्फ सिद्धू अभंगे हा आहे. सिद्धू सध्या जामिनावर बाहेर असून तडीपार असतानाही त्याचा काही गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.चित्रफितीवर निर्माता म्हणून पॉवर डायरेक्टरचा उल्लेख आहे. चित्रफितीमध्ये ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खा. राजन विचारे, आ. जितेंद्र आव्हाड, आ. निरंजन डावखरे, आ. रवींद्र फाटक, काँग्रेस नेते नारायण राणे, माणिकराव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष मनोज प्रधान, श्रीलंकन क्रिकेटपटू सनथ जयसूर्या तसेच अभिनेता सुनील शेट्टी आदी मान्यवरांसोबत या गुन्हेगारांनी काढलेल्या छायाचित्रांचा समावेश आहे.राजकीय नेत्यांसोबतची छायाचित्रे सर्वत्र पसरवून, दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाºया या चित्रफितीची गंभीर दखल खंडणीविरोधी पथकाने घेतली आहे. ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाची धुरा चकमकफेम अधिकारी प्रदीप शर्मा यांच्याकडे असून त्यांनी यासंदर्भात चौकशी सुरू केली आहे. चित्रफीत कुणी तयार केली, कुणी फॉरवर्ड केली याबाबत तांत्रिक चौकशी सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिली.तीन आरोपींची पेशी : चित्रफितीमधील दहापैकी तीन आरोपींची या प्रकरणामध्ये खंडणीविरोधी पथकासमोर शनिवारी पेशी झाली. अधिकाºयांनी त्यांना चित्रफितीसंदर्भात विचारणा केली. चित्रफीत आम्ही तयार केली असती, तर स्वत:ला पहिल्या क्रमांकावर दाखवले असते, असे या आरोपींनी अधिकाºयांना सांगितले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Policeपोलिस