शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

जिल्ह्यात दुबार भात लागवडीचे संकट टळले

By admin | Published: July 21, 2015 4:48 AM

ठाणे व पालघर या दोन्ही जिल्ह्यात सुमारे एक लाख २६ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड करणे बाकी आहे. परंतु पावसाने विलंब केल्यामुळे

सुरेश लोखंडे, ठाणेठाणे व पालघर या दोन्ही जिल्ह्यात सुमारे एक लाख २६ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड करणे बाकी आहे. परंतु पावसाने विलंब केल्यामुळे अद्याप लागवड होऊ शकली नाही. परंतु मागील दोन दिवसांपासून या दोन्ही जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्यामुळे संभाव्य दुबार पेरणी व रिक्त क्षेत्रातील भात लागवड न होण्याचे संकट टळल्याचे कृषी विभागाकडून सांगितले जात आहे. रविवारच्या मध्यरात्रीपासून ठाणेसह पालघर जिल्ह्यात पावसाने संततधार धरली आहे. ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत ४३१४.७४ मिमी पाऊस पडला आहे. ठाणेशहर परिसरात दुपारनंतर सुरू झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंतही जोरदारपणे पडला. याशिवाय कल्याण, मुरबाड, शहापूर, उल्हासनगर आणि अंबरनाथ, भिवंडी तालुक्यातही या पावसाने जोरदार सुरूवात केली आहे. सायंकाळपर्यंत ठाणे जिल्ह्यात सरासरी ६१६ मिमी या पावसाची नोंद झाली आहे.पालघर जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे ११३९ मिमी पाऊस पडला असून सरासरी १४२ मिमी नोंद झाली आहे. सोमवारीही पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड आदी आदिवासी भागात जोरदार पाऊस पडला आहे. यामुळे या जिल्ह्यातील दुबार पेरणीचे संकट काही अंशी टळल्याचे शिवसेनेचे पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी सांगितले. ठाणे व पालघर या दोन्ही जिल्ह्यात एक लाख ३२ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीपाचे पीक घेतले जाणार आहे. यापैकी एक लाख २६ हजार हेक्टर क्षेत्र भात लागवडी खाली असून उर्वरित नागली, १५ हजार ९०५ हेक्टरवर तर वरी सुमारे ११ हजार ३२० हेक्टवर आहेत. यापैकी ठाणे जिल्ह्यात सुमारे ६० हजार हेक्टरवर भात लागवड होते. या वर्षी हेक्टरी २५०० क्ंिवटल भात उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांसह दोन्ही जिल्हह्यातील कृषी विभागाने कंबर कसली आहे. ३४ हजार मेट्रीक टन खताचा वापर करण्याचे नियोजन जिल्ह्यात करण्यात आलेले आहे. याशिवाय बियाणे जया, रत्ना, विजेता, रूपाली, सह्याद्री आदी भाताचे सुमारे २३ हजार ५२९ क्विंटल बियाणे वापरण्यात आले आहे. त्यापैकी ठाणे जिल्ह्यात ११ हजार ६३७ पैकी १० हजार ९८६ क्विंटल बियाण्याचा वापर शेतकऱ्यांनी केला आहे. तर चार हजार ७०० मेट्रीक टन खताचा पुरवठा झाल्याचे ठाणे जिपचे कृषी विकास अधिकारी डॉ. प्रफुल्ल बनसोडे यांनी सांगितले. पावसामुळे शेतकरी बांधवांत समाधानाचे वातावरण आहे.