कल्याण : कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लवकरच जाहीर होणार आहे. त्यासाठी मतदारयादी तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात सुरू आहे. सरकारच्या नव्या नियमानुसार १० गुंठे जागा असलेला शेतकरीच मतदार होऊ शकतो. हा नियम शेतकºयांना बाजार समितीशी थेट जोडणारा असला तरी याच नियमामुळे कल्याण तालुक्यातील ४० टक्के शेतकरी मतदारयादीत समाविष्ट होत नसल्याचा गंभीर मुद्दा कल्याण तालुका शेतकरी संघटनेने मांडला आहे.संघटनेचे अध्यक्ष व बाजार समितीचे माजी सभापती वंडार पाटील यांच्यासह टीडीसी बँकेचे अनंत शिसवे, माजी सभापती अरुण पाटील आणि सर्वपक्षीय संघर्ष समितीचे सरचिटणीस चंद्रकांत पाटील यांनी कल्याणचे तहसीलदार व बाजार समितीचे प्रशासक शहाजी पाटील यांना या मुद्यावर निवेदन सादर केले. यापूर्वी तालुक्यातील १९ नोंदणीकृत शेतकरी सोसायट्यांच्या सदस्यांना मतदानाचा अधिकार होता. त्यांच्या मतदानावर बाजार समितीचे संचालक मंडळ निवडले जात होते. संचालक मंडळाच्या मतदानातून सभापती निवडला जात होता. नव्या नियमानुसार १० गुंठे शेतजमीन असलेल्या शेतकºयांना मतदानाचा हक्क बजावता येईल. कल्याण तालुक्यात १०० गावे आहेत. या गावांत ७० ते ८० हजार शेतकरी आहेत. एखाद्या कुटुंबात पाच भावांकडे १०० गुंठे जमीन आहे. त्याची विभागणी केल्यास प्रत्येक भावाच्या वाट्याला २० गुंठे जागा येते. त्यानुसार, ते मतदार होऊ शकतात. मात्र, एकाच कुटुंबातील पाच जणांना मतदानाचा अधिकार देता येत नाही. त्यामुळे सर्वच भावांना बाद करण्यात येत आहे. वास्तविक, पाच भावांपैकी एकाला तरी मतदानाचा हक्क दिला जावा, अशी संघटनेची मागणी आहे. काही ठिकाणी पाच भावांच्या नावावर ५६ गुंठे जागा आहे. त्याची समान विभागणी शक्य नाही. त्यामुळे ते पाचही जण बाद ठरतात.>जमिनीच्या निकषाचा मुद्दा कल्याण तालुक्यासाठी गंभीर आहे. काही जिल्ह्यांमध्ये शेतकºयांच्या नावे मोठ्या प्रमाणात शेतजमीन असल्याने त्यांना सरकारच्या निकषाचा फटका बसलेला नाही. बाजार समितीचे माजी सभापती तथा संघटनेचे अध्यक्ष असलेले वंडार पाटील यांचेच नाव नव्या निकषानुसार मतदारयादीत समाविष्ट होऊ शकले नाही. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती ही मुंबई व नवी मुंबई बाजार समित्योच्या पाठोपाठ तिसºया क्रमांकाची मोठी बाजार समिती आहे. कल्याणचा बाजार हा स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रसिद्ध आहे. कल्याणच्या पंचक्रोशीतील शेतकºयांना ही बाजार समिती सोयीची पडते. शेतकरी संघटनेच्या पदाधिकाºयांनी या मुद्यावर सरकाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. पूर्वी बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकºयांचा थेट सहभाग नव्हता. आता ती संधी सरकारने दिली असली, तरी १० गुंठ्यांच्या अटीमुळे ४० टक्के शेतकरी मतदानापासून वंचित राहण्याची भीती आहे. दहा गुंठ्यांच्या निकषामुळे कल्याण तालुक्यातील जवळपास ४० टक्के शेतकरी मतदारयादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहणार आहेत.
१० गुंठ्यांचा निकष शेतकऱ्यांच्या मतदानावर गदा आणणारा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 12:28 AM