शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
6
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
7
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
8
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
9
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
10
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
11
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
12
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
13
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
14
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
15
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
16
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
17
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
18
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
19
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
20
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप

नगरसेवकांच्या भूमिकेवर संघर्ष समितीची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 1:28 AM

केडीएमसीतून २७ गावे वगळण्याचा मुद्दा : चार वर्षांत प्रभागांमध्ये किती विकासकामे केली?

कल्याण : केडीएमसीतून २७ गावे वगळू नका. स्वतंत्र नगरपालिकेची गरज नाही, अशी भूमिका २७ गावांतील नगरसेवकांनी घेतल्याने त्यांच्या या भूमिकेविषयी सर्वपक्षीय संघर्ष समितीने तीव्र शब्दांत आगपाखड केली आहे. नगरसेवकांनी चार वर्षांत त्यांच्या प्रभागांत किती विकासकामे केली, असा खोचक सवाल समितीचे सचिव नरेश पाटील यांनी केला आहे.

केडीएमसीच्या २०१५ च्या निवडणुकीत नगरसेवक हे संघर्ष समितीच्या पाठिंब्यावर निवडून आलेले आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २७ गावे महापालिकेतून वगळणार ही काळ्या दगडावरची रेष आहे, असे वक्तव्य केले होते. त्यावेळी भाजप, संघर्ष समिती, मनसे, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एका व्यासपीठावर होते. शिवसेना सोडून सगळ्यांचा स्वतंत्र नगरपालिकेच्या मागणीस पाठिंबा होता. आजही आहे. आजच्या घडीला महाविकास आघाडीच्या सरकारमधील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेच्या नेत्यांनी गावे वगळण्याच्या मागणीला विरोध असल्याचे कुठेही म्हटलेले नाही. तरीदेखील काही नगरसेवक २०१७ मध्ये फडवणीस यांना दिलेल्या पत्राचा आधार घेत सर्वच नगरसेवकांचा गावे वगळण्यास विरोध असल्याचे सांगत आहेत. मात्र, हे पत्र जुने असल्याने गावे वगळण्यास आमचा विरोध नाही, असे काही नगरसेवकांनी संघर्ष समितीशी संपर्क करून सांगितले.प्रत्यक्षात, यासंदर्भात पुन्हा नगरसेवकांकडे विचारणा केली की, जुन्या पत्राचा संदर्भ दिला जात आहे. त्यावेळी त्यांनी नव्या पत्राचा दाखला दिला. मात्र, नव्या पत्राच्या शेवटच्या पानावर सात सदस्यांचीच स्वाक्षरी असल्याचे पाहावयास मिळाले.त्याचबरोबर विरोध करणारे भाजप नगरसेवक हे सध्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि माजी राज्यमंत्री व डोंबिवलीचे विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात आहेत का, असा सवाल केला आहे. तसेच शिवसेनेचे सदस्य त्यांच्या नेतृत्वाविरोधात ही मागणी करीत आहे का, असा दुहेरी प्रश्न समितीने उपस्थित केला आहे.विरोध करणाऱ्या काही सदस्यांनी यासंदर्भात संपर्क साधला असता त्यांनी सगळेच सदस्य हे स्वतंत्र नगरपालिकेच्या विरोधात आहेत. मात्र, त्यांच्यावर काही लोक दबाब टाकत असल्याने त्यांच्याकडून स्वतंत्र नगरपालिकेच्या मागणीचा नकार दर्शविला जात आहे.यासंदर्भात मनसे आमदार राजू पाटील म्हणाले, ‘स्वतंत्र नगरपालिकेच्या मुद्यावर मनसे पूर्वीपासून ठाम होती. शिवसेना आता या मागणीसंदर्भात राजकारण खेळत आहे. त्यामुळेच काही सदस्य स्वतंत्र नगरपालिकेच्या मागणीस विरोध करीत आहेत.’स्वतंत्र नगरपालिकाच हिताची-पाटीलसंघर्ष समितीचे सरचिटणीस चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, ‘स्वतंत्र नगरपालिकेची मागणी ही २७ गावांच्या हिताची आहे. तिला जनसमर्थन मिळत असताना जनहिताच्या विरोधात बरळणे म्हणजे हा कोडगेपणा आहे. या सगळ्या मुद्यावरून स्वतंत्र नगरपालिकेच्या मागणीवरून नगरसेवक व संघर्ष समिती तसेच विविध राजकीय पक्ष यांच्यात दोन गट पडले असल्याचे दिसून येत आहेत.’

टॅग्स :thaneठाणेkdmcकल्याण डोंबिवली महापालिका