शहरं
Join us  
Trending Stories
1
घोळ संपेना! मविआचा नवा फॉर्म्युला, तिघांना प्रत्येकी ९० जागा; १८ जागा मित्र पक्षांना
2
आजचे राशीभविष्य: ३ राशींना अनुकूल, आर्थिक लाभ संभवतात; सुखाचा, शांततेचा दिवस
3
मिलिंद देवरा यांना शिंदेसेनेकडून उमेदवारी? वरळीतून आदित्य ठाकरेंच्या विरोधात रिंगणात
4
ठाण्यात मनसे-महायुती छुपी युती? ठाणे, कल्याण, डोंबिवलीत निवडणूक लढण्याची शक्यता धूसर
5
१३८ कोटींचे सोने पकडले; विशेष चारचाकी वाहनावर पुण्यात कारवाई; कायदेशीर प्रक्रिया सुरू
6
भाजप, शिंदेसेनेच्या तीव्र विरोधामुळे नवाब मलिक यांना अद्याप तरी उमेदवारी नाहीच!
7
विधानसभा निवडणूक: पोलिसांच्या नाकाबंदीत खालापूर टोल नाक्यावर दहा कोटींची चांदी जप्त
8
३६ जागांवर महायुती अन् मविआचेही ‘वेट अँड वॉच’; एकमेकांच्या उमेदवारांची प्रतीक्षा
9
राजकारणातील सर्वच पुतण्यांचा DNA एकसारखाच, अडचणीत आणाल तर...- छगन भुजबळ
10
राहुल नार्वेकरांच्या मालमत्तेत चार कोटींची वाढ; पाच वर्षात आशिष शेलारांची संपत्तीत किती वाढली?
11
रांगोळीवरही निवडणुकीचा रंग! पालघरमधील सफाळेत मतदान जनजागृतीचे अनोखे आवाहन
12
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
13
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
14
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
15
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
16
बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते
17
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)
18
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
19
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
20
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी

साडेअठरा हजार शेतकऱ्यांना १०० कोटी ५६ लाखांचे पीककर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 12:07 AM

ठाण्यासह पालघरच्या शेतकऱ्यांचा समावेश : ‘टीडीसी’चा पुढाकार

सुरेश लोखंडे ठाणे : खरीप लागवडीसाठी शेतकºयांना आर्थिक चणचण भासू नये, यासाठी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ठाणे व पालघर जिल्ह्यांतील १८ हजार ५९५ शेतकºयांना यंदाच्या खरीप हंगामास अनुसरून १०० कोटी ५६ लाख ६४ हजार रुपयांचे पीककर्जवाटप केले आहे.

या दोन्ही जिल्ह्यांत १७ हजार ६०४.७० हेक्टर क्षेत्रावर यंदा भात, नागरी, वरी, सोयाबीन आदी खरीप पीक शेतकºयांकडून घेतले जात आहे. त्यासाठी लागणाºया बी-बियाणांसह कीडनाशक औषधी, खत आणि मशागतीस लागणाºया खर्चासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेने खरीप पीककर्ज योजना लागू केली आहे. त्यास अनुसरून ठाणे जिल्ह्यातील १९२ शेती संस्थांच्या माध्यमातून १० हजार ८५६ शेतकºयांच्या नऊ हजार ३७३.८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांसाठी कर्जवाटप झाले आहे. सुमारे ५२ कोटी ५५ लाख ५८ हजार रुपये या पीककर्जापोटी शेतकºयांना वाटप केल्याचे ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेने स्पष्ट केले आहे.

जिल्ह्यातील सर्वाधिक पीककर्जपुरवठा शहापूर तालुक्यातील पाच हजार १३.१५ हेक्टरवरील पिकांसाठी करण्यात आला आहे. यामध्ये पाच हजार ४२४ सभासद शेतकºयांचा समावेश आहे. त्यांना २५ कोटी ८७ लाख ८९ हजार रुपयांचे पीककर्ज मिळाले आहे. याखालोखाल मुरबाड तालुक्यातील तीन हजार २२३ शेतकºयांना १४ कोटी ५३ लाख, तर भिवंडी तालुक्यातील एक हजार ८६७ शेतकºयांना नऊ कोटी ९४ लाख १४ हजार रुपयांचे पीककर्जवाटप झाले आहे. तर, सर्वात कमी ठाणे तालुक्यातील ३४ शेतकºयांना ३९.४५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांसाठी केवळ २३ लाख ४३ हजार रुपये पीककर्ज मिळाले आहे.

पीककर्जापोटी वाटप केलेल्या १०० कोटी ५६ लाख रकमेपैकी ४८ कोटी रुपये पालघर जिल्ह्यातील शेतकºयांनादेखील शुक्रवारपर्यंत वाटप केले आहेत. या कर्जाचा लाभ सात हजार ७३७ शेतकºयांना झाला. त्यांच्या आठ हजार २३०.९० हेक्टरवरील खरिपाच्या पिकास अनुसरून बँकेने हा कर्जपुरवठा शेतकºयांना केला. या जिल्ह्यातील १७५ शेती संस्थांच्या नेतृत्वाखाली या शेतकºयांना कर्जपुरवठा झाला आहे.सर्वात जास्त पीक कर्ज वाडा तालुक्यात मंजूर करण्यात आले आहे. या तालुक्यातील तीन हजार ३६० शेतकºयांना त्यांच्या तीन हजार ५९१.९० हेक्टरवरील पिकांसाठी २१ कोटी ६३ लाख ५६ हजार रुपये कर्जवाटप झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.पालघर तालुक्यातील २0६२ शेतकºयांच्या एक हजार ७१५ हेक्टरवरील पिकांसाठी ११ कोटी ३५ लाखांचे कर्जवाटप झाले आहे. या जिल्ह्यात सर्वात कमी तलासरीतील ९९ शेतकºयांना त्यांच्या ११४.४० हेक्टरवरील पिकांसाठी ६६ लाख ९३ हजारांचे पीककर्ज मिळाले आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीCrop Loanपीक कर्ज