- प्रशांत मानेकल्याण : पश्चिमेकडील एपीएमसी मार्केटच्या मैदानावर रविवारी पार पडलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. कल्याण डोंबिवली, मुंब्रा, उल्हासनगर, भिवंडी आणि ठाणे जिल्ह्यातील नागरिक या सभेसाठी आले होते. पोलिसांच्या अंदाजानुसार हा आकडा १0 ते १५ हजारांच्या आसपास होता. ठाण्याशिवाय बाहेरून आलेल्या नागरीकांनीही या सभेला मोठी गर्दी केली होती. कल्याण डोंबिवली हा युतीचा बालेकिल्ला असताना बहुजन आघाडीच्या सभेला झालेली गर्दी पाहता राजकीय पंडितांच्या मते, ही भाजपासाठी धोक्याची घंटाच आहे.रविवारच्या बहुजन आघाडीच्या सभेला भारीप नेते प्रकाश आंबेडकर यांच्यासह एमआयएमचे सर्वेसर्वा खासदार असदुद्दीन ओवेसी, आमदार वारीस पठाण यांनी उपस्थिती लावली होती. लोकसभा निवडणूक जवळ आली आहे. त्या पार्श्वभूमीवर या सभेमध्ये बहुजन आघाडीतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषपूर्ण वातावरण होते. सभेला कसा प्रतिसाद मिळतो, याकडे येथील शिवसेना, भाजपा पदाधिकाऱ्यांच्या नजरा लागल्या होत्या. कल्याण पश्चिम मतदारसंघात भाजपाचा आमदार असून, भिवंडी लोकसभेत मोडणाºया या भागाचा खासदारही भाजपाचाच आहे. पश्चिमेतील केडीएमसीचे नगरसेवक सेनेचे आहेत. असदुद्दीन यांची कल्याणमधील पहिली सभा होती. त्यांचे भाषण कडवट असते. त्यामुळे सभेत ते कोणाला लक्ष्य करतात, याकडे सर्वांचे लक्ष होते. सभेची वेळ दुपारी दोनची होती. त्यामुळे एक वाजतापासूनच कार्यकर्ते आणि पदाधिकाºयांनी गर्दी करायला सुरु वात केली होती. ही गर्दी पाहता चोख पोलीस बंदोबस्त तैनात होता. कल्याण डोंबिवलीसह भिवंडीतूनही पोलीस बंदोबस्तासाठी होते. पोलीस उपायुक्त डॉ संजय शिंदे हेदेखील जातीने होते. प्रमुख वक्त्यांचे चार वाजण्याच्या आसपास आगमन झाले. सभा तब्बल चार ते पाच तास चालली. तरीही एकही कार्यकर्ता जागचा हलला नाही. गर्दीचे नियोजन करताना आयोजकांची तारांबळ उडाली होती.कार्यकर्त्यांनी मोठा परिसर व्यापल्याने पत्रकारांनाही बसण्यासाठी जागा नव्हती. अखेर त्यांना सुरक्षेच्या कारणास्तव मज्जाव असलेल्या सभेसमोरील क्षेत्रात बसविण्याची वेळ आयोजकांवर आली. ओवेसी यांनी भाषणाच्यावेळी परिधान केलेली कोळी बांधवांची टोपी लक्षवेधी ठरली. दरम्यान, ओवेसी आण िआंबेडकरांच्या तडाखेबाज आणि रोखठोक भाषणाने कार्यकर्ते आणि पदाधिकाºयांमध्ये जल्लोषाचे वातावरण पसरल्याचे पहावयास मिळाले. कल्याण पश्चिममधील सभेला मिळालेल्या उस्फुर्त प्रतिसादामुळे सत्ताधाºयांच्या भुवया उंचावल्या आहेत.बहुजन आघाडीचा धोका नेमका कुणाला?वंचित बहुजन आघाडीची सभा सेनेच्या बालेकिल्ल्यात पार पडल्याने हा भाजपा-सेनेसाठी धोका असल्याचे मानले जात असले तरी, काही जाणकारांच्या मते यामध्ये जास्त नुकसान काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे होण्याची शक्यता आहे.वंचित आघाडीकडे दलित तथा मुस्लिम मतदान आकर्षित होण्याची शक्यता आहे. हा मतदार वर्ग बरेचदा काँग्रेसलाही झुकते माप देतो. याशिवाय केवळ सभेला गर्दी जमवून काही साध्य होत नाही. ती मतांमध्ये परावर्तीत करणे सर्वांना जमत नाही, असे जाणकारांचे मत आहे.
वंचित आघाडीच्या सभेतील गर्दी युतीचा रक्तदाब वाढविणारी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 12:59 AM