उल्हासनगर : कॅम्प नं-४, मराठा सेक्शन येथील उल्हास विद्यालयाच्या पटांगणावर पाडव्याच्या दिवसी श्री कालिका कला संस्थेच्या वतीने अमृत महोत्सवी वर्षा निमित्त दिवाळी पहाटचे आयोजन केले होते. दिवाळी पहाटचा आनंद शेकडो नागरिकांनी लुटला आहे.
उल्हासनगरातील सर्वात जुने कालिका कला मंडळ अमृत महोत्सव वर्ष साजरे करीत आहे. त्यानिमित्ताने दिवाळी पाडव्याच्या दिवसी दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन उल्हास विद्यालयाच्या पटांगणात केले होते. कायर्क्रमाची सुरुवात पंडित उमेश चौधरी यांनी राग अहिर भैरव मधील अलबेला सजन आयोजी याने करून पहाटेची सुरवात मंगलमय केली. यानंतर पंडित उमेश चौधरी, गायिका सौ अनुराधा केळकर व प्राची बेहेरे यांनी सादर केलेल्या नाट्यगीत, भिक्तगीत, व भावगीतांमध्ये उल्हासनगरकर अक्षरशः न्हाऊन निघाले. त्यांना हार्मोनियमची साथ ओंकार दातार व तबल्याची साथ निषाद पवार तसेच तालवाद्याची साथ श्री मंगेश चौधरी यांनी केली. प्रथेप्रमाणे भैरवी रागाने कायर्क्रमाची सांगता न करता अनुराधा केळकर यानी भटीयार रागातील “ एक सुर चराचर छायो जी “ या चीजेने करुन सवर् आसमंत सुरांनी भारुन टाकलं.
दिवाळी पाडव्याची पहाट अशी सुंदर व सुरमयी केल्याबद्दल नागरिक मंडळाला धन्यवाद देत होते. या कायर्क्रमाला स्थानिक नगरसेवक शेखर यादव, मंडळाचे अध्यक्ष जगनाथ चोडणकर, कार्याध्यक्ष दिलीप मालवणकर, पदाधिकारी, सदस्यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.