शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देण्यासाठी जनसागर; देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यात येऊन दिल्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 6:54 AM

नांदेड जिल्ह्याच्या लोहा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी खारीक खोबऱ्याचा हार आणला. जिल्ह्यातील मण्याड खोऱ्यातील ही परंपरा असून २१ किलो वजनाचा हार बनवण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्र्यांना दीर्घायुष्य लाभो, ही प्रार्थना कार्यकर्त्यांनी केली.

ठाणे : बुधवारी रात्री बारा वाजेपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘शुभदीप’ या ठाण्यातील निवासस्थानी कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे यांचा हा पहिलाच वाढदिवस असल्याने शुभेच्छा देण्यासाठी तुफान गर्दी पाहण्यास मिळाली. शिंदे यांनी आपल्या किसननगर येथील जुन्या घराला भेट दिली आणि तेथे ते आपल्या जुन्या आठवणींमध्ये रममाण झाले. त्यांनी तेथील शाखेलाही भेट दिली. शिंदे यांनी आनंद आश्रमात येण्यापूर्वी दिवंगत आनंद दिघे यांना शक्तिस्थळावर जाऊन अभिवादन केले. त्यानंतर ते आनंद आश्रमाकडे रवाना झाले. या ठिकाणी त्यांनी कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. शिवमंदिरात जाऊन दर्शन घेतले. तेथील लहान मुलांसह केक कापून वाढदिवस साजरा केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यात येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सकाळीच अभीष्टचिंतन केले. भाजप आमदार निरंजन डावखरे यावेळी हजर होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दूरध्वनी करून शिंदे यांना शुभेच्छा दिल्या.  कोणी धान्य, कोणी क्रिकेटचे साहित्य, कोणी खाद्यपदार्थ वाटप केले. नऊ रुपयांमध्ये नऊ खाद्यपदार्थांची मेजवानी आणि मोफत पाणीपुरी वाटप अशा उपक्रमांनी लक्ष वेधून घेतले होते. शिवाजी महाराज मैदानात कबड्डी सामन्यांचे आयोजन केले होते.

सव्वा किलोचा कंदी पेढ्यांचा हारशिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कंदी पेढ्यांचा हार घेऊन सातारकर आले होते. सव्वा किलो कंदी पेढ्यांच्या या हारामध्ये ७५ पेढ्यांचा समावेश होता.

खारीक खोबऱ्याचा हार भेटनांदेड जिल्ह्याच्या लोहा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी खारीक खोबऱ्याचा हार आणला. जिल्ह्यातील मण्याड खोऱ्यातील ही परंपरा असून २१ किलो वजनाचा हार बनवण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्र्यांना दीर्घायुष्य लाभो, ही प्रार्थना कार्यकर्त्यांनी केली. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसthaneठाणेShiv Senaशिवसेना