कल्याण - कोविडची सामना करण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेने डॉक्टर, नर्सची आणि वॉर्डबॉयची भरती प्रक्रिया सुरु केली आहे. या पूर्वी भरतीचे तीन टप्पे झाले आहे. आज चौथ्या टप्प्यात वॉर्डबॉयच्या 80 जागासाठी महापालिकेने ऑनलाईन जाहिरात दिली आहे. या जाहिरातीला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. राज्यातील विविध भागातून जवळपास दीड हजार पेक्षा जास्त तरुण-तरुणींनी महापालिका मुख्यलयात आज एकच गर्दी केली. या भरती प्रक्रियेच्या वेळी सोसल डिस्टसिंगचा फज्जा उडाला. महापालिकेने कोविडशी सामना करण्यासाठी भरती प्रक्रिया सुरु केली आाहे. ही भरती कोविड काळापूरती मर्यादीत आहे. यापूर्वी महापालिकेने डॉक्टर, नर्ससाठी भरती प्रक्रिया राबविली होती. भरतीच्या चौथ्या टप्प्यात वॉर्डबॉयच्या 80 जागासाठी ऑनलाईन जाहिरात दिली होती. त्यासाठी दहीवीर्पयत शैत्रणिक पात्रता आहे. तसेच वॉर्डबॉयला प्रति महिना 18 हजार रुपये पगार दिला जाणार आहे. कोविड काळात लॉकडाऊनमुळे विविध उद्योग व्यवसायाना प्रचंड आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे लोक बेरोजगार होत आहे. कोरोना काळात केवळ वैद्यकीय क्षेत्रत नोकर भरती केली जात आहे. 80 वॉर्डबॉयच्या जागांसाठी राज्यातील विविध कानाकोप:यातून उमेदवार भरतीसाठी महापलिका मुख्यालायत आज धडकले आहेत. त्यांना महापालिकेच्या सुभाष मैदानाता थांबविले होते. त्यांची कागदपत्रे जमा करुन घेण्यासाठी महापालिका प्रशासनाने पाच टेबल मांडले होते. उमेदवारांना रांगेने सोडण्यात येत असले तरी सोसल डिस्टसिंग पाळले जात नव्हते. महापालिका हद्दीत कोरोना रुग्ण वाढत असल्याने उद्या 2 ते 12 जुलै दरम्यान कडक लॉकडाऊन जाहिर केला आहे. त्याच महापालिकेकडून भरती प्रक्रियेसाठी सोसल डिस्टसिंग पाळले जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यातून प्रशासनाचा ढिसाळपणा उघड झाला आहे.धुळे येथून चारशे किलोमीटरचा प्रवास करुन दुचाकीवरुन कल्याण गाठणारा प्रवीण बागूल या तरुणाने सांगितले की, लॉकडाऊनमुळे ट्रेन, बसची सुविधा नाही. हाताला काम नाही. ऑनलाईनवर जाहिरात वाचली. काल सायंकाळी पाच वाजता धुळ्य़ावरुन निघालो. रस्त्यात पाऊस होता. पहाटे तीन वाजता कल्याणमध्ये पोहचलो. इतका लांबचा प्रवास करुन आल्यावर याठिकाणी 8o जागांसाठी इच्छूकांची इतकी मोठी गर्दी पाहून आमचे सिलेक्शन होईल की नाही याविषयी मी साशंक आहे.
कल्याण-डोंबिवलीत वॉर्डबॉयच्या 80 जागांसाठी दीड हजार तरुणांची गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2020 4:14 PM