शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

CSMT Bridge Collapse आई, तुझ्याविना कसा जगू...; लहानग्या ओमकारची आर्त हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 12:02 AM

चिमुकली चिन्मयी मातेच्या पार्थिवाचा घट्ट पकडलेला हात सोडेना

- अनिकेत घमंडी / सचिन सागरेडोंबिवली : आई, अजून एक दिवस सुटी वाढवून घे ना... ओमकार शिंदे आपल्या चारपाच दिवस सुटीवर असलेल्या आईला गुरुवारी सायंकाळी विनवत होता आणि त्याची आई भक्ती शिंदे (४०) मुलाचे मन मोडून जीटी रुग्णालयात कामावर गेल्या, त्या परत आल्याच नाहीत. शुक्रवारी त्यांच्या पार्थिवाला बिलगून... आई, आता तुझ्याशिवाय मी कसा राहू, अशा शब्दांत ओमकारनं फोडलेला टाहो काळीज पिळवटून टाकत होता.मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील पादचारी पूल कोसळण्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. या दुर्घटनेत सहाजणांचा मृत्यू झाला. त्यात जीटी रुग्णालयातील परिचारिका भक्ती शिंदे, अपूर्वा प्रभू (३२), रंजना तांबे (४८) या तिघींचा मृत्यू झाला. या तिघीही डोंबिवली पश्चिमेत राहायला होत्या. त्यामुळे त्या परिसरावर अक्षरश: शोककळा पसरली होती.तांबे, प्रभू आणि शिंदे या तिघी १५ ते २० वर्षांपासून मुंबईतील जीटी रुग्णालयात कामाला होत्या. गुरुवारी रात्रपाळी असल्याने घरातून निघालेल्या तिघी रुग्णालयात पोहोचण्यासाठी पुलावरून जात असतानाच ही दुर्दैवी घटना घडली. दीनदयाळ रोड परिसरातील ओमसाई दत्त इमारतीमध्ये पती राजेंद्र शिंदे, मुलगा ओमकार (१४) आणि सासू यांच्यासोबत भक्ती राहत होत्या. त्यांच्या निधनामुळे शिंदे परिवार व शेजारी शोकाकुल झाले आहेत.पश्चिमेतील ठाकूरवाडी परिसरात असलेल्या उदयराज इमारतीमध्ये पती अभय प्रभू, मुलगा गणेश (१२) आणि मुलगी चिन्मयी (१०) यांच्यासोबत अपूर्वा राहत होत्या. हे दोघेही सेंट जॉर्ज शाळेत सातवी आणि पाचवीमध्ये शिकत आहेत. आपल्यावर कोसळलेल्या या भीषण संकटामुळे गणेश आणि चिन्मयी कावरीबावरी झाली होती. अपूर्वा यांचे पार्थिव अंत्यसंस्काराकरिता जेव्हा घेऊन जायला निघाले, तेव्हा मी आईला सोडणार नाही, असे म्हणत लहानग्या चिन्मयीचा बांध फुटला आणि साऱ्यांचे डोळे पाणावले. अपूर्वा यांचे पती खाजगी कंपनीत कामाला आहेत. आता या दोन लहानग्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी खांद्यावर येऊन पडलेले अभय यांच्या चेहऱ्यावरील दु:ख व तणाव सतत जाणवत होता.पश्चिमेतील गणेशनगर परिसरात असलेल्या शिवसागर इमारतीमध्ये आपल्या आईसोबत रंजना तांबे राहत होत्या, तर त्यांचा भाऊ गरिबाचावाडा परिसरात असलेल्या कृष्णाबाई सज्जन दर्शन येथे राहतो. त्यांना तीन विवाहित बहिणी आहेत. अविवाहित असलेल्या रंजना जीटी रुग्णालयात कामाला होत्या, अशी माहिती रंजना यांचे नातलग विजय तांबे यांनी दिली. आपला म्हातारपणीचा आधार असलेली रंजना गेली, यावर तिच्या आईचा विश्वासच बसत नव्हता. त्यांना जबर मानसिक धक्का बसला असल्याचे तांबे कुटुंबीयांनी सांगितले.भक्ती ३५ वर्षांपासून आमच्या शेजारी होत्या. सर्वांसोबत मिळूनमिसळून राहणाऱ्या भक्तीचा दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू होतो, ही दु:खदायक घटना आहे. तिला एक मुलगा असून त्याचे शिक्षण व्हायचे आहे. त्याला आता कोण सांभाळणार? जर असे पूल पडत गेले, तर लोकांचे कसे होणार? पुलाची दुरवस्था झाली असेल तर कार्यवाही कोणी केली पाहिजे? पूल पडूनही दोषींवर कारवाई होत नाही, हे संतापजनक आहे. जीवाभावाच्या माणसाचा मृत्यू झाल्यानंतर पैसे मिळून काय उपयोग? आमची माणसे आम्हाला परत मिळणार आहेत का? पुन्हा अशी घटना होऊ नये म्हणून काळजी घेण्याची तुमची जबाबदारी नाही का? - सीमा शिंदे, भक्ती यांच्या शेजारीअपूर्वा, रंजना आणि भक्ती या तिन्ही जीटी रुग्णालयाच्या परिचारिका होत्या. आम्ही रुग्णसेवा करायला घर सोडून जेव्हा बाहेर पडतो, तेव्हा आम्ही घराचा विचार करत नाही. रुग्णालयातील रुग्णांची सेवा करण्यासाठी निघालेल्या या तिघींचे आयुष्य एका क्षणात उद्ध्वस्थ झाले. आम्हाला कितीही पैसे दिले तरी आमचा माणूस परत येणार नाही. रेल्वे आणि महापालिका प्रशासन आज एकमेकांकडे बोट दाखवत आहे. तुमच्या भांडणात आमचा माणूस गेला.- वर्षा नरे, निवृत्त परिचारिका, जीटी रुग्णालय

टॅग्स :CST Bridge Collapseसीएसएमटी पादचारी पूल दुर्घटनाthaneठाणे