सदानंद नाईक
उल्हासनगर : शहरात बहुसंख्यानी असलेल्या सिंधी बांधवानी आपली सांस्कृतिक, इतिहास, भाषा, सभ्यता आदींची ओळख पुढील पीडिला होण्यासाठी सिंधी भाषा दिवस महापालिका मुख्यालया मागील लॉन्स मध्ये १० एप्रिल रोजी रविवारी साजरा झाला. कार्यक्रमाला माजी आमदार पप्पु कलानी, माजी महापौर मीना आयलानी, संत भाऊ लिलाराम, साई कालीराम यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थितीत होते.
उल्हासनगर हे सिंधी समाजाचे शहर म्हणून ओळखले जात असून येथे निघणाऱ्या जागतिक दर्जाची चेटीचंड यात्रेत सहभागी होण्यासाठी परदेशातील हजारो सिंधी बांधव येतात. १० एप्रिल १९६७ साली चेटीचंडच्या दिवशी सिंधी भाषेला संविधानाच्या ८ वी अनुसूची मध्ये मान्यता मिळाली. तेंव्हा पासून १० एप्रिल रोजी सिंधी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. सिंधी युवा संस्थेच्या काजल मुलचंदानी यांच्यासह सहकाऱ्यांनी महापालिका मुख्यालय मागील लॉन्स मध्ये सिंधी दिवसा निमित्त रंगारंग कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमात सिंधी सांस्कृतिक, सिंधी सभ्यता, सिंधी भाषा, सिंधी समाजाचा इतिहास आदी सिंधी दिवसानिमित्त विविध कार्यक्रम करण्यात आले.
सिंधी दिवसा निमित्त सिंधी समाजातील कला, चित्रपट, पत्रकार, व्यवसाय, शैक्षणिक आदी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्यांना गौरविण्यात आले. कार्यक्रमाला माजी आमदार पप्पु कलानी, माजी महापौर मीना आयलानी, झुलेलाल मंदिराचे भाऊ लिलाराम, साई कालीराम, राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे, दिलीप मालवणकर, प्रकाश गुरणानी, महेश सुखरामनी यांच्यासह समाजातील नामांकित व्यक्ती उपस्थित होते. एकीकडे सिंधी भाषा दिवस शहरात साजरा होत असताना दुसरीकडे महापालिका सिंधी शाळा एकापाठोपाठ एक बंद झाल्या आहेत. सिंधी भाषा शाळा बंद झाल्याने, सिंधी भाषेवर प्रश्नचिन्हे उभे ठाकले. सिंधी समाजाने सक्तीने आपल्या मुलांना एक विषय सिंधी भाषेचा देणे गरजेचे असल्याचे मत यावेळीं अनेकांनी व्यक्त केले.