शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

उत्सुकता अन् जबाबदारीची जाणीवही...पहिलं मतदान न विसरण्यासारखंच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 1:03 AM

आयुष्यातील पहिली घटना प्रत्येकासाठीच अविस्मरणीय असते. त्या घटनेला विशेष असं महत्व असतं. त्याचप्रकारे पहिले मतदानही तेवढेच महत्वाचे असते.

आयुष्यातील पहिली घटना प्रत्येकासाठीच अविस्मरणीय असते. त्या घटनेला विशेष असं महत्व असतं. त्याचप्रकारे पहिले मतदानही तेवढेच महत्वाचे असते. लोकशाहीतील सर्वाधिक मोठा उत्सव म्हणजे निवडणुका होय. या निवडणुकांमध्ये मतदान मोठ्या प्रमाणात व्हावे, यासाठी शासन स्तरावर मोठ्या प्रमाणात जनजागृतीही केली जाते. मतदानाला अनन्यसाधारण महत्व असून, आपण केलेल्या पहिल्या मतदानाच्या वेळी कशी परिस्थिती होती, उत्साह होता की जबाबदारीची जाणीव, अशा काही मुद्यांवर जाणून घेतलेल्या निवडक मान्यवरांच्या आठवणींचा हा धांडोळा.

जबाबदारीची जाणीव करून देणारा क्षण

मी मूळची अलिबागची. आम्ही श्रीबागमध्ये राहायला होतो. बाबा प्रकाश जोशी स्टेट बँकेत मॅनेजर, तर आई कमल जोशी ट्रेझरीमध्ये होती. एखाद्या नोकरदार कुटुंबात ज्या पद्धतीचे संस्कार मुलांवर होतात, तसेच आम्हा भावंडांवर झाले होते. लोकशाहीचे महत्त्व आम्हाला बाबा नेहमी सांगायचे. माझं पहिलं मतदान होतं, तेव्हाही बाबांनी जबाबदारीची जाणीव करून दिली होती. कान्होजी आंग्रे समाधीस्थळाजवळील मराठी शाळेत आमचे मतदानकेंद्र होते. तेथे जाण्यासाठी एका उमेदवाराने घरी रिक्षा पाठवली होती; मात्र त्या सुविधेचा लाभ घेतला असता, तर मतदान करताना मनावर थोडेफार दडपण आले असते. त्यामुळे आम्ही उमेदवाराची रिक्षा नम्रपणे नाकारली. पहिल्या मतदानाबद्दल बरीच उत्सुकता होती. मतदानकेंद्रावर बोटाला शाई लावली जाणार असल्याने नेलपॉलिश लावली नव्हती. त्यावेळी ईव्हीएम नव्हत्या. त्यामुळे मतदानकेंद्रावरील कर्मचाऱ्यांनी मतपत्रिकेवर शिक्का कसा मारायचा, याची माहिती दिली होती. मतदान केल्यानंतर आपला हक्क बजावल्याची नव्हे, तर कर्तव्यपालन केल्याची भावना होती. घरी आल्यावर बाबांनी केवळ मतदान केलं का, एवढंच विचारलं. मतदान कुणाला केलं, हे विचारण्याचे टाळून गोपनीय मतदानाचे महत्त्व त्यांनी आमच्या मनावर त्यावेळीच बिंबवले होते.- मेधा जोशी, फाइन आर्टिस्ट

आणीबाणीनंतरचे दुसऱ्या स्वातंत्र्यलढ्याचे मत

आणीबाणीनंतर, म्हणजे १९७८ साली मी पहिल्यांदा मतदान केल्याचं नक्की आठवतं. त्याआधी शिक्षणासाठी वेगवेगळ्या ठिकाणी राहावं लागल्याने इच्छा असूनही मतदान करता आलं नव्हतं. पहिल्यांदाच मत दिल्यावर खूप मोठ्ठं झाल्यासारखं वाटून अंगावर मूठभर मांस चढलं होतं. माझं सरकार मी निवडू शकतो, ही भावनाच खूप जबाबदारीची आणि अभिमानाची होती. आता मात्र तेवढं काही वाटत नाही. वाचन-लिखाणामुळे सामाजिक, राजकीय सजगता माझ्यात लहानपणापासूनच असल्याने मी स्वत:च मतदारयादीत माझं नाव नोंदवलं होतं. मतदानाच्या दिवशी तर आपण काहीतरी मोठं काम करीत आहोत, अशी भावना असायची आणि त्यामुळे खूप उत्साह असायचा. लोकनायक जयप्रकाश नारायणांच्या आंदोलनामुळे स्वातंत्र्यपूर्व काळाप्रमाणे राजकीय सजगता निर्माण झालेली होती. देशाभिमानाने सर्व वातावरण भारल्यासारखं होतं. स्वातंत्र्याचा दुसरा लढा दिल्यासारखी ही निवडणूक आमची पिढी कधीच विसरणार नाही. मी जेव्हा पहिल्यांदा मतदान केले, तेव्हा साहजिकच आणीबाणीतील दडपशाही व अत्याचार हेच प्रमुख मुद्दे निवडणुकीच्या प्रचारात होते.- अरुण सु. पाटील, कवी आणि लेखक

शेतकरी विरुद्ध भांडवलदार अशी लढाईमी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मतदान केलं, साधारण १९६५ च्या आसपास. तेव्हा एक वेगळा उत्साह आणि उत्सुकता होती. त्यावेळी असणारे स्थानिक कार्यकर्ते हे आमचे मित्रच होते. त्यांनीच आमचे फॉर्म वगैरे भरून नाव नोंदवले होते. तेव्हा आमच्या भागात शेकाप विरुद्ध काँग्रेस अशी लढाई होती. शेतकरी आणि भांडवलदार असे चर्चेचे मुद्दे होते. वातावरण चढाओढीचे कधी तणावाचे तर कधी आक्रमक होत असे. तेव्हा कार्यकर्तेही खटाºयातून प्रचारात सहभागी होत असंत. उन्हात टेबल टाकून नोंदी ठेवणे. भजीवडा, शेवचिवडा खायला मिळत असे. एक वेगळीच मजा असायची.- नारायण लाळे, ज्येष्ठ लेखक, समीक्षक

मराठी माणसांच्या नोकऱ्या हा होता मुद्दामे १९६७ साली मी लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदान केलं होतं. २० व्या वर्षी केलेलं ते माझं पहिलं मतदान होतं. पहिल्यांदा मतदान करणार म्हणजे प्रौढ झाल्यासारखं वाटलं. आम्ही स्वत:ही कार्यकर्ते म्हणून कार्यरत होतो. त्यामुळे आम्हीच आमचे नाव मतदारयादीत नोंदवले होते. त्यावेळी ईव्हीएम नसल्याने मत देण्यासाठी उमेदवाराच्या नावासमोर स्टॅम्प मारण्याची पद्धत होती. स्टॅम्प मारल्यावर आडवी घडी घातली आणि ओली शाई दुसºया उमेदवाराच्या नावावरही उमटली तर गोंधळ व्हायचा. मराठी लोकांना नोकºया मिळाल्या पाहिजे. परकीयांचे आक्रमण थांबले पाहिजे, असे मुद्दे त्यावेळी होते.- डॉ. सुधाकर फडके, ज्येष्ठ नाट्यसमीक्षक

टॅग्स :ElectionनिवडणूकVotingमतदान