शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
2
"मुख्यमंत्री नाही, पण ५ मिनिटांसाठी तरी पंतप्रधान होणार", महादेव जानकरांनी व्यक्त केला विश्वास 
3
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
4
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा
5
Basmath Vidhan Sabha 2024: दोन राष्ट्रवादीत लढत! जयप्रकाश दांडेगावकर vs राजू नवघरे रिंगणात... गुरूच्या विरोधात शिष्य!
6
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
7
Fact Check: 'जर्सी नं. 7' धोनीच्या सन्मानार्थ RBI ७ रुपयांचं नाणं आणणार?; व्हायरल दाव्यामागील सत्य वेगळंच
8
Maharashtra Election 2024 Live Updates: महाराष्ट्राची निवडणूक ही विचारसरणीची निवडणूक- राहुल गांधी
9
खासगी विमान, ३० हून अधिक लक्झरी कार्स, परदेशात मालमत्ता; नायजेरियाच्या राष्ट्रध्यक्षांची संपत्ती किती?
10
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
11
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
12
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
13
Sankashti Chaturthi 2024: तुमचा आज संकष्टीचा उपास आहे? जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ आणि नियम!
14
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
16
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
18
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
19
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
20
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर

निसर्गरम्य म्हारळला गुन्हेगारीचा श्राप; कायद्याचे रक्षकच फिरतात भक्षकांसोबत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 12:29 AM

म्हारळ परिसरात दीड ते दोन वर्षात अनेक हत्या झाल्या. यामुळे गावाला रक्तरंजित इतिहास आहे.

म्हारळ परिसरात दीड ते दोन वर्षात अनेक हत्या झाल्या. यामुळे गावाला रक्तरंजित इतिहास आहे. गावदेवी परिसरात रमेश केणे या रिक्षाचालकाचा खून, दोन नेपाळींचे हत्याकांड, वरप येथे पोद्दार कंम्पाऊंडजवळ झालेली बाळा म्हसकर यांची हत्या, इत्यादी घटनांनी म्हारळ हादरून गेले होते. गेल्यावर्षी सूर्यानगर येथे मेहंदी शेखची झालेली हत्या, आंबेडकरनगरमध्ये सतत होणारा मारहाणीच्या घटना आणि नंग्या तलवारी हातात घेऊन फिरणारे तरूण, यामुळे कायम दहशतीचे वातावरण असते. कांबा येथील तरूणाच्या मृत्यूमुळे कल्याण येथील खासगी रु ग्णालयाच्या तोडफोडीचे वृत्तांकन करण्यास गेलेल्या पत्रकारावर झालेल्या जीवघेणा हल्ल्याची घटनाही सर्वश्रुत आहे. खऱ्या गुन्हेगारांना सोडून आम्हालाच गोवण्यात आल्याचा आरोप याप्रकरणी त्यावेळी ताब्यात घेतलेल्या आरोपींनी केला होता. त्यात आता फय्याज खान या अल्पवयीन मुलाची झालेली हत्या, यातून काही बाबी समोर आल्या आहेत. या प्रकरणातील आरोपीही अल्पवयीन आहेत. परिसरात सहज उपलब्ध होणारी दारू, गांजा आणि अन्य अमली पदार्थ, यातून वाढणाºया गुंडगिरीमुळे हत्याकांडासारखे गंभीर गुन्हेही होत आहेत. या प्रकारांना वेळीच आळा घातला नाही, तर भविष्यात उग्ररूप धारण करू शकते.या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर संघटीत आणि असंघटीत गुन्हेगारी वाढू नये म्हणून गुन्हेगारांचे रेकॉर्ड तयार करण्यास सुरूवात केल्याचे उपअधीक्षक संजयकुमार पाटील यांनी सांगितले. याची अंमलबजावणी त्वरित होणे अत्यावश्यक आहे; अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते.गुंडांचा गावभरात मुक्त संचारम्हारळमध्ये गुंडांना कुणाचाही धाक राहिलेला नाही. गावातील अल्पवयीन मुले हातात शस्त्रे घेऊन रस्त्यावरून बिनदिक्कतपणे फिरताना दिसतात. येथील परिस्थिती पाहिली की, हे गाव महाराष्ट्रातील आहे, की उत्तर प्रदेश किंवा बिहारमधील आहे, असा प्रश्न पडतो. मुळात कायद्याचे रक्षकच भक्षकांसोबत फिरत असल्याने गुंडगिरीविरोधात आवाज उठवण्यापूर्वी ग्रामस्थ दहावेळा विचार करतात. आपली व्यथा मांडायची तरी कुणापुढे, असा येथील ग्रामस्थांचा प्रश्न आहे.गुन्हेगारांसाठी पोषक वातावरण२०११ च्या जनगणनेनुसार म्हारळची लोकसंख्या ३१ हजार ६०० होती. ती आजमितीला ७५ हजारापर्यंत पोहोचली आहे. प्रभाग क्रमांक एकला लागूनच असलेल्या झोपडपट्ट्या, चाळी आणि वनजमिनीवर झालेली अतिक्र मणे यामुळे गावाला बकालपण आले आहे.या परिसरातून उल्हासनगर, खेमानी, अंबरनाथसाठी गेलेला रस्ता आणि दुसºया बाजूला कल्याण-मुरबाड महामार्ग, यामुळे म्हारळ गुन्हेगारांसाठी आश्रयस्थान झाले आहे. गुन्हा करून झाल्यावर येथून पळून जाण्यासाठी फायदेशीर होते. याचा फायदा हे गुन्हेगार राजरोसपणे घेतात.प्रवाशांना दमदाटी करून त्यांच्याकडील वस्तू हिसकावून घेण्याचे प्रसंग येथे वरच्यावर घडतात. प्रवाशांना मारहाण करण्याचे प्रकारही सर्रास घडतात. याच कारणामुळे सायंकाळनंतर रिक्षाचालक येथे येण्यास धजावत नाहीत. टिटवाळा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या म्हारळ चौकीवर सात गावांची जबाबदारी आहे.प्राचीन इतिहासशिवरायांचे मावळे कल्याणमध्ये आल्यावर वतनदारी म्हणून मिळालेल्या गावांपैकी म्हारळ एक गाव असल्याचे बोलले जाते. येथे देशमुख हा मराठा समाज मोठ्या प्रमाणात होता. त्यानंतर म्हात्रे, केणे आणि परेल (आदिवासी ठाकूर समाज) हे येथे आले आणि शेती तसेच अन्य कामे करू लागले. शिवाय येथील महादेवाच्या मराळेश्वर मंदिरालाही प्राचीन इतिहास आहे.म्हारळ गावासाठी १९८३ ते ८७ पर्यंत ग्रामपंचायत होती. त्यानंतर ते कल्याण पालिकेत समाविष्ट करण्यात आले. उल्हासनगर नगरपालिका जवळ असल्याने हे गाव कल्याण पालिकेतून वगळून, तत्कालीन मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी उल्हासनगर पालिकेत पुन्हा समाविष्ट करून घेतले.१९९५ च्या दरम्यान शिवसेनेचे नेते साबीर शेख यांनी आंदोलन करून म्हारळ आणि अन्य गावे पुन्हा तेथून काढून घेतली. ती आजमितीला कल्याण पंचायत समितीत समाविष्ट आहेत. म्हारळ गावाला केवळ गुन्हेगारीचेच ग्रहण लागले नाही, तर विविध समस्यांनीही घेरले आहे. कल्याण पंचायत समितीच्या अंतर्गत हा परिसर येतो.दहागाव येथे आरोग्य उपकेंद्र आहे. गावात कुणी आजारी पडल्यास या केंद्रात घेऊन जाण्यासाठी नऊ ते दहा किलोमीटरचे अंतर कापावे लागते. त्यापेक्षा रूग्णाचे नातेवाईक कल्याण किंवा उल्हासनगराला जाणे पसंत करतात. गटारांची कधीही स्वच्छता होत नसल्याने, त्यातील घाण पाणी नेहमी रस्त्यावरून वाहत असते.जागोजागी कचºयाचे ढीग पसरलेले असतात. त्यामुळे मलेरिया, डेंग्यू येथील नागरिकांच्या पाचवीलाच पुजलेले आहेत. नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊनही यंत्रणा दुर्लक्ष करीत आहे. नियमित कचरा उचलला जात नाही, अशी येथील ग्रामस्थांची तक्रार आहे.उच्चभ्रूंसाठी गृहसंकुलेम्हारळ ग्रामपंचायतीमध्ये सहा प्रभाग असून क्र मांक एकमध्ये आंबेडकर नगर, इंदिरानगर, बौद्धवाडा, रामदेवबाबा नगर, रेणुकानगर, लक्ष्मीनगर, हनुमाननगर (जो भाग अंबरनाथ आणि उल्हासनगरला जोडतो) आदींचा समावेश आहे. हा संपूर्ण परिसर चाळीवजा झोपडपट्टींचा आहे.यामध्ये परप्रांतीयांचा भरणा अधिक आहे. त्याचप्रमाणे प्रभाग चारमध्येही बºयाच प्रमाणात नवीन घरे झाल्याने तेथेही बाहेरून आलेल्यांचा लोंढा आहेच. दुसºया बाजूला कल्याण-मुरबाड महामार्गालगतच उच्चभ्रूंसाठी गृहसंकुले उभारली जात आहेत.तेथे रहिवासी राहण्यासाठी आल्यावर म्हारळची लोकसंख्या आणखी वाढणार आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणेवर आणखी ताण येणार आहे. त्याकरिता पोलीस कर्मचाºयांची संख्या वाढविणे अधिक गरजेचे आहे.कल्याण तालुक्यातील म्हारळच्या लोकसंख्येमध्ये दोन जिल्हा परिषद आणि चार पंचायत समिती सदस्य निवडून येतात. यामध्ये १० ते १५ टक्के स्थानिक आणि जवळपास ८० ते ८५ टक्के परप्रांतीय आहेत. स्वतंत्र पोलीस ठाणे होणे, ही काळाची गरज आहे. मी सरपंच असतानाही, ही मागणी केली होती.- प्रमोद देशमुख, उपसरपंचसावे, ही आमची मागणी आहे. ग्रामपंचायतीने याविषयी पुढाकार घ्यायला हवा. सर्वसामान्यांना न्याय मागण्यासाठी टिटवाळा गाठावे लागते. गोरगरीब व्यक्तींना तेथे पोहचणे अवघड जाते.- गुलाबराव जाधव, माजी मुख्याधापकस्वतंत्र पोलीस ठाण्यासाठी म्हारळ येथील सर्वे क्रमांक ५८ (भाग नंबर १६) मधील दोन एकर जागेपैकी एक एकर जागा पोलीस ठाण्याला मिळण्यासाठी कल्याण तहसीलदारांकडे अर्ज केला होता. त्यांनी भूमी अभिलेखच्या उपअधीक्षकांना पत्र दिले आहे. जागेची मोजणी करून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. गावामध्ये पूर्वी सलोख्याचे वातावरण होते.- महेश देशमुख, ग्रामस्थपूर्वी कोणत्याही कारणावरून वाद झाला, की तंटामुक्त गाव समिती मिटविण्याचा प्रयत्न करायची. हस्तक्षेप करूनही तंटा मिटण्याची शक्यता दिसत नसल्यास सदस्य समितीच्या अध्यक्षांशी संपर्कसाधून त्यांची मदत घेतली जायची. सेंच्युरी रेयॉन कंपनीत काम करणारे कामगार म्हारळ येथे भाड्याने घरे घेऊन राहू लागली. त्यामुळे मुंबईचा लोंढा येथे येऊ लागल्याने हळूहळू सलोखा बिघडू लागला. याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी स्वतंत्र पोलीस ठाणे हा एकच पर्याय आता शिल्लक राहिला आहे .- निलेश देशमुख, माजी उपसरपंचयेथील लोकसंख्या पाहता पोलिसांनी तसा तपशीलवार अहवाल तयार करून तो सरकारला द्यावा. पोलीस बळ वाढवून घ्यावे, जेणे करून कायदा-सुव्यवस्था बिघडणार नाही.- अमित सानप, तहसीलदारहद्दीचा वाद नाही; पण तीन परिमंडळाची हद्द येते ही वस्तूस्थिती आहे. गुन्ह्यांचे प्रमाण विचारात घेऊन अधिकारी आणि पोलीस कर्मचारी वाढवले जातील. याची अंमलबजावणी त्वरित केली जाईल. याशिवाय गंभीर गुन्ह्यांमधील आरोपींवर मकोकाअंतर्गत कारवाई केली जाणार आहे. यापुढे गुंडगिरी, खंडणी आणि दहशत निर्माण करणाºयांवर मकोकाअंतर्गत कारवाई करण्यासाठी गुन्हेगारांचे रेकॉर्ड बनविण्यास सुरूवात केली आहे.- संजयकुमार पाटील,पोलीस उपाधीक्षक,ठाणे ग्रामीण

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवली