शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
2
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
3
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
4
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
5
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
6
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
7
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
8
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
9
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
10
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
11
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
12
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
13
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
14
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
15
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
16
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
17
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
18
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
19
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
20
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय

सिंड्रेलातील रुपेशच्या लिरीकलने गाजला नृत्याभिनयाचा ३७३ वा कट्टा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 3:50 PM

सिंड्रेलातील रुपेश बनेच्या लिरीकलने नृत्याभिनयाचा ३७३ वा कट्टा रविवारी गाजला.  

ठळक मुद्दे३७३ व्या अभिनय कट्टयावर नृत्याभिनयकट्ट्याचा कलाकार रुपेश बने याचे नृत्यभिनय सादरीकरणअध्यक्ष दिग्दर्शक किरण नाकती यांनी प्रेक्षकांशी संवाद साधला

ठाणे : रविवार २२ एप्रिल २०१८ रोजी ३७३ व्या अभिनय कट्टयावर नृत्याभिनय पार पडले. यावेळी प्रमुख आकर्षण ठरले ते म्हणजे  "सिंड्रेला" या मराठी सिनेमातील आसक्या  अर्थात कट्ट्याचा कलाकार रुपेश बने याचे नृत्यभिनय सादरीकरण.

 ‎      प्रथेप्रमाणे रंगदेववतेच्या आराधनेने कट्ट्याची सुरवात झाली आणि त्यासाठी ज्येष्ठ प्रेक्षक प्रतिनिधी गोविंदराव मुळे यांचा सहभाग होता. कट्ट्याचे प्राथमिक सत्र हे एकपात्री अभिनयाने नटले होते ज्या मध्ये नूतन लंके हिने "प्रिय आई" ही तर शुभांगी गजरे हिने "भांडकुदळ" ही एकपात्री सादर केली. सई कदम हिने गणेश गायकवाड लिखित "अंधश्रद्धा" ह्या नाट्यछटेद्वारे अद्यापही समाजात होत असलेल्या भोंदू-भगत गिरी वर भाष्य केले.कट्ट्याच्या पुढील प्रमुख सत्रात विविध नृत्याभिनय पार पडले ज्याची सुरवात हर्षदा शिंपी हिने चायना गेट या सिनेमातील "छम्मा छम्मावर" ताल धरत केली. पुढे रुक्मिणी कदम आणि साक्षी महाडिक यांनी अनुक्रमे "विसरू नका श्रीरामाला" व "दिल चीज क्या आप मेरी".. या वर आपली अदाकारी पेश केली. नूतन लंके हिने" मूड मूड के ना देख" मूड मूड  के यावर एका परिक्षार्थीचे मनोगत मांडत मूड मूड के ना देख या शब्दांद्वारे धम्माल उडवून दिली.पुढे माधुरी कोळी यांनी "आज  फिर जिने की तमन्ना हे" ,शिवानी देशमुख हिने व्हेंटिलेटर सिनेमातील "बाबा",  कुंदन भोसले याने "यु.पी. वाला ठुमका लागउ" या गाण्यांवर सादरीकरण करत नृत्याभिनयाचे ऊत्तम नमुने सादर करत रसिकांचे मनोरंजन केले. मेरे हातो मे नौ नौ चुडीया है यावर रोहिणी राठोड, परदे मे रेहने दो यावर शुभंगी भालेकर, तितली बनके यावर प्राची सूर्यवंशी व सिंड्रेला सिनेमातील "देवा" या हृदयस्पर्शी गाण्यावर रोशनी उंबरसाडे या सर्वांनी आपल्या नृत्यभिनयाद्वारे रसिकांची मने जिंकली. या नंतर अंतिम सदरामध्ये काही धमाकेदार सादरीकरणांचा समावेश होता ज्या मध्ये परेश दळवी या कलाकाराने मेरी जिंदगी सवारी.. या गीतावरील सादरीकरणाच्या माध्यमातुन कट्ट्याचा रंगमंच आणि त्याची मैत्री व्यक्त करत उपस्थितांच्या टाळ्या लुटल्या. परेश ने साकारलेला रंगकर्मी आणि त्याचा जवळचा सच्चा मित्र म्हणजे त्याचा रंगमंच या त्याची संकल्पना लोकांना मनापासून भावली. अंतिम सादरीकरणा अगोदर कट्ट्याचे अध्यक्ष दिग्दर्शक किरण नाकती यांनी प्रेक्षकांशी संवाद साधत आपले मनोगत व्यक्त केले. नृत्यभिनयाच्या लक्षवेधी सादरीकरणामध्ये रुपेश बने याने लिरीकल हा डान्स फॉर्म सादर केला. वडील नसणाऱ्या एका तरुण मुलाची दुर्दशा रुपेश ने नृत्याभिनया द्वारे अगदी अचूक मांडत रसिकांची मने जिंकली. सदर कट्ट्याच्या निवेदनाची धुरा विणा छत्रे हिने उत्तम रित्या पार पाडली.

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईcultureसांस्कृतिक