शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
3
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
4
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

ग्राहकदिनीही ग्राहक मंच उपेक्षितच!

By admin | Published: March 15, 2016 1:05 AM

ग्राहकांच्या वाढत्या तक्रारी सोडवण्यात ग्राहक मंचाला चांगलेच यश येत आहे. त्यामुळे ठाण्यातील ग्राहक मंचाचा व्याप दिवसेंदिवस वाढतोच आहे. मात्र, तरीही अद्याप या मंचाला आपल्या

ठाणे : ग्राहकांच्या वाढत्या तक्रारी सोडवण्यात ग्राहक मंचाला चांगलेच यश येत आहे. त्यामुळे ठाण्यातील ग्राहक मंचाचा व्याप दिवसेंदिवस वाढतोच आहे. मात्र, तरीही अद्याप या मंचाला आपल्या रोजच्या कामकाजासाठी प्रशस्त सोडाच, पण पुरेशी जागाही उपलब्ध नाही. मंगळवारी जागतिक ग्राहक दिन साजरा होत असताना ग्राहकांना दिलासा देणाऱ्या ग्राहक मंचाची उपेक्षा थांबत नसल्याचे, त्याचीच परवड सुरू असल्याचे विदारक वास्तव उघड झाले आहे.सध्या जिल्हाधिकारी कार्यालयात कमी जागेत या मंचाचा कारभार सुरू आहे. त्यापेक्षा मोठी जागा मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न झाले. जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी या प्रयत्नांची दखल घेत तलावपाळी येथील दुय्यम निबंधकाचे कार्यालय देण्याची घोषणा केली. मात्र, आता ती जागाही या मंचाला कमी पडणार आहे.मंचासाठी ही जागा नवीन असली तरी प्रत्यक्षात ही इमारत मात्र जुनी आहे. या दोन मजली इमारतीची डागडुजीदेखील मोठ्या प्रमाणात करावी लागणार आहे. दुरुस्तीचा हा भाग सोडला तरी मंचाला आवश्यक असलेली सुमारे पाच हजार स्क्वेअर फुटांची ही जागा नाही. जेमतेम दीड ते दोन हजार स्क्वेअर फुटांची ही जागा आजच कमी पडते आहे. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी इमारतीचे दोन्ही मजले ग्राहक मंचाला देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. मंचाला जागा मिळावी, यासाठी आरटीआय कार्यकर्ते व ज्येष्ठ नागरिक महेंद्र मोने यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सतत पाठपुरावा केला. त्यामुळेच जिल्हाधिकाऱ्यांनी मनावर घेऊन गडकरी रंगायतनच्या बाजूला असलेल्या दुय्यम निबंधकाचे दुसऱ्या मजल्यावरील कार्यालय देऊ केले. मात्र, ही जागादेखील अपुरी आहे. ग्राहक मंचाचा वाढता व्याप आणि सातत्याने वाढणाऱ्या तक्रारी पाहता मंचाला दोन्ही मजले देऊन आगामी ३० वर्षांची समस्या सोडवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. यावर, जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उद्याच्या ग्राहक दिनी जर या संदर्भात काही सकारात्मक निर्णय झालाच तर मंच तसेच तक्रारदारांना देखील दिलासा मिळेल.