हितेन नाईक लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : जिल्ह्यातील अनेक महिला व ग्राहकांची इंटरनेट द्वारे होणारी लूट रोखण्यासाठी सायबर सेलचे पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी सायबर गुन्ह्याच्या जागरूकतेविषयी बनवलेल्या चित्रफितींचे उदघाटन मुख्यमंत्र्यांनी केले व त्याचे कौतुकही केले.मोबाईल द्वारे इंटरनेट आणि सोशल मीडिया चा वापर करून फसवणुक करण्याच्या प्रकरणात सतत वाढ होत असून सन २०१५ मध्ये ३२ गुन्हे तर सन २०१६ मध्ये ४९ गुन्ह्यांची नोंद करण्यात आलेली आहे.ह्या गुन्ह्याच्या प्रकारांना आळा घालण्याबरोबरच लोकांमध्ये जनजागृती करण्याचे आव्हान पोलीस अधीक्षक कार्यालया समोर उभे राहिले होते. पोलीस उपनिरीक्षक कदम ह्यांनी लिहिलेल्या सायबर गुन्हे व जागरूकता ह्या पुस्तकाची अनेकस्तरावरून प्रशंसा झालेली आहे. जिल्ह्यातील विविध शाळा, कॉलेजेस मध्ये जाऊन त्यांनी विद्यार्थ्यांना महत्वपूर्ण टिप्स दिल्या होत्या.सध्या एटीएम द्वारे होणाऱ्या फसवणुकीचे वाढते प्रमाण पाहून एटीएम कार्ड फसवणूक आणि इंटरनेट वरून महिलांची फसवणूक या दोन चित्रिफती त्यांनी बनविल्या आहेत. ह्या चित्रफितीमध्ये त्यांनी मोबाईल द्वारे एटीएमची माहिती घेऊन ग्राहकांची केली जाणारी फसवणूक व त्याबाबत ग्राहकांनी घ्यावयाची खबरदारी याचे चित्रीकरण केले असून दुसऱ्या चित्रफितीत मोबाईल द्वारे कॉल करून परदेशातील मी श्रीमंत व्यक्ती आहे असे सांगून एक तरु ण अनेक तरुणीशी मैत्री करून परदेशातून गिफ्ट पाठविल्याचा बहाणा करून त्यासाठी लागणारे शुल्क तरु णींना कसे भरायला लावतो. तरुणींची फसवणूक करतो व ते कसे टाळता येते याचे चित्रीकरण आहे. यासाठी सोमनाथ कदम याना जिल्हा पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे यांचे सहकार्य लाभले असून तलासरी येथील आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांनी कदम ह्यांचे कौतुकहि केले. विशेष पोलीस महानिरीक्षकाच्या हस्ते अनेक पदके व सन्मानचिन्हे हि प्राप्त झाली आहेत.
सायबर गुन्हे जागृतीच्या सीडीचे प्रकाशन
By admin | Published: May 23, 2017 1:25 AM