ठाणे : रस्ते सुरक्षा अभियानांतर्गत ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने ठाण्यात प्रथमच प्रदूषणमुक्तीसाठी सायकल रॅली आयोजित केली आहे. वाहनांची संख्या वाढत असल्याने प्रदूषणही कळत-नकळत वाढते आहे. त्यामुळे प्रदूषण मुक्तीचा दिवस साजरा करण्यासाठी ठाणे आरटीओने यंदाच्या रस्ता सुरक्षा अभियानाचे औचित्य साधून एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. येत्या शनिवारी, १४ जानेवारीला प्रदूषण मुक्तीचा संदेश देणारी सायकल रॅली काढली जाईल. लेकसिटी पेडलेर्स सायक्लिंग क्लबच्या सहकार्याने तिचे आयोजन केले जाईल. त्यात १८ वर्षावरील वयोगटासाठी २१ किमी, १५ वर्षावरील वयोगटात १२ तसेच १०-१५ वयोगटासाठी पाच किमी असे टप्पे असून सहभागासाठी हेल्मेट सक्ती असेल. ती विनामूल्य असून त्यात सहभागी होण्यासाठी आरटीओने खास लिंक तयार करून त्यावर अर्ज उपलब्ध करून दिला आहे. तो अर्ज भरून रॅलीत सहभागी होण्यासाठी नोंदणी करायची आहे. या ँ३३स्र२://ॅङ्मङ्म.ॅ’/ाङ्म१े२/ङ्म्नु0५9स्रएछाङ्मअ९उ५ल्ल1 लिंकवर १५० जणांनी आपली नोंदणी केली आहे. या रॅलीसाठी ३०० जणांचा सहभाग अपेक्षित आहे. आतापर्यंत आठ दिवसांत १५० जणांनी नोंदणी केली आहे. यात पुरूषांची संख्या जरी जास्त असली तरी, १४ महिलांनी रॅलीसाठी नोंदणी केल्याची माहिती आरटीओ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी दिली. १२ जानेवारीपर्यंत रॅलीसाठी नाव नोंदवता येणार आहे. (प्रतिनिधी)
प्रदूषणमुक्तीसाठी सायकल रॅली
By admin | Published: January 09, 2017 7:23 AM