शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
5
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
6
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
7
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
8
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
9
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
10
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
11
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
13
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
14
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
15
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
16
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
17
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
18
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

डोंबिवलीत डोळ्यांचे पारणे फेडणारा रिंगण सोहळा, पंढरीच्या वारीची हुबेहूब आठवण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2017 8:31 PM

पंढरीची वारी म्हटली की, वारक-यांकडून जे रिंगण धरले जाते. त्यात जो देवाचा अश्व धावतो. त्याभोवती फेर धरला जातो. पंढरीच्या वारीसारखाचा देखणा रिंगण सोहळा डोंबिवली क्रीडासंकुलात रंगला.

डोंबिवली: पंढरीची वारी म्हटली की, वारक-यांकडून जे रिंगण धरले जाते. त्यात जो देवाचा अश्व धावतो. त्याभोवती फेर धरला जातो. पंढरीच्या वारीसारखाचा देखणा रिंगण सोहळा डोंबिवली क्रीडासंकुलात रंगला. टाळ मृदुंगाच्या टाळात ज्ञानोबा तुकारामाचा जय घोष आणि विठू माऊलीचा गजराने सगळा परिसर भक्तीमय वातावरणाने दुमदुमला होता.आगरी कोळी महोत्सवाचे आयोजन डोंबिवलीतील क्रीडा संकुलात करण्यात आले आहे. सावळाराम महाराज क्रीडा नगरीत हा महोत्सव होत आहे. सावळाराम महाराजांनी अध्यात्मीक कामाची मेहूर्त मेढ डोंबिवलीसारख्या शहरात रोवली. तिचा प्रचार प्रचार पंचक्रोषीत केला. त्यांच्या कार्याला स्मरुनच महोत्सवाची सुरुवात दिंडीने करण्यात आली. संतवाडीतून दिंडी निघाली. त्यात 555 मृदुंग वादक, 2 हजार टाळ वादक, 200 जणांनी भगवी पताका खांद्यावर घेतली. असा सगळा वारकरी मेळा त्यात सहभागी झाला. महिलांनी डोक्यावर तुळस घेतली. टाळ मृदुंगाच्या गजरात ज्ञानोबा माऊली तुकाराम हा जयघोष करीत दिंडी संतवाडी ते टिळक चौक, टिळक चौक ते घरडा सर्कल आणि घरडा सर्कलहून तिचे आगमन क्रीडा संकुलात झाले. त्याठिकाणी भव्य रिंगण धरण्यात आले. त्यावेळी दोन अश्व सोडले होते. हा सगळा मनोहरी रिंगण भक्तीमय सोहळा पाहण्यासाठी नागरीकांनी एकच गर्दी केली होती. इतक्या मोठय़ा संख्येने वारकरी सहभागी झाले. मात्र त्यांच्यात पंढरीच्या वारीची शिस्तच याठिकाणी पाहावयास मिळाली. कुठेही अनियोजन पाहावयास मिळाले नाही. विठूरायाच्या गजराने सगळा परिसर भक्तीमय झाल्याच्ो चित्र याठिकाणी पाहावयास मिळाले. जणूकाही ही पंढरीचीच वारी सुरु आहे असा फिल त्याठिकाणी होता. ज्ञानदेवाच्या पालखी सोहळ्य़ातील पारंपारीक चोपदार बाळासाहेब रणदिवे यांनी सांगितले की, प्रत्येक माणसाची सेवा परमेश्वर चरणी जमा होत असते. प्रत्येक भक्त त्यांचे दु:ख आणि यातना देवाच्या चरणी ठेवतो. देवाला वेगळे काही सांगण्याची गरज भासत नाही. वारीत शेतकरीही असतो. वारीत सहभागी होणारा शेतकरी पाऊस पडला नाही तर दु:खी होत नाही. त्याला परतीच्या पावसाची अपेक्षा असतो. त्याचा पांडूरंगावर विश्वास असतो. पंढरीच्या विठूकडे सगळे जण आपल्याप्रमाणो जगत कल्याणाची भावना ठेवतो. तशी करुणा भाकतो हे पंढरीच्या कानडा राजाच्या भक्तीचे वैशिष्ट आहे. त्यामुळे त्यांच्या भक्तीत मोठी ताकद आहे.

टॅग्स :dombivaliडोंबिवली