लोकमत न्यूज नेटवर्कबोर्डी : महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचा ६९ व्या वर्धापन दिन गुरु वारी डहाणू बस आगारात साजरा करण्यात आला. या वेळी सर्वत्र स्वच्छता आणि सजावट करण्यात आली होती. आगर व्यवस्थापक मंजिरी बेहेरे यांच्या अध्यक्षतेखाली छोटेखानी कार्यक्र मातून एसटी कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना पुष्प तसेच मिठाई वाटून आनंद साजरा केला. उत्त्पन्न वाढीचा ध्यास घेऊन एसटीला गतिमान करू या ब्रीदाने ६९ वा वर्धापन दिन राज्यभर साजरा करण्यात आला. या वेळी मान्यवरांचे स्वागत करून कर्मचारी तसेच प्रवाशांना पुष्प व मिठाई देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. ब्रम्हाकुमारी डहाणू मिशनच्या राजश्रीबेन यांनी एसटीच्या वैभवशाली जीवनयात्रेचे श्रेय कर्मचाऱ्यांना देऊन जीवनात स्वत: आनंदी राहून इतरांना आनंदी करण्याचे आवाहन केले. विभागीय वाहतूक अधिकारी आशिष चौधरी यांनी मंडळा तर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध बावीस योजनांची माहिती दिली. नागरिकांच्या सुखदु:खाची साक्षीदार असलेल्या एसटीची गौरवगाथा सांगून त्यातील कर्मचाऱ्यांच्या योगदानाबद्दल आगर व्यवस्थापकांनी सर्वांचे अभिनंदन केले. त्या नंतर एमएच-१४:बीटी-४३२५ या सजवलेल्या एसटीचे पूजन करून मिठाईचे वाटप करण्यात आले. या वेळी कर्मचारी तसेच प्रवाशांनी उपस्थित राहून आनंद साजरा केला. सूत्रसंचालन दत्तात्रय भागवत यांनी केले. यावेळी अनेक मान्यवर व प्रवासी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.बोईसरला एस टी चा ६९ वा वर्धापन दिन बोईसर : ६९वा वर्धापन दिनी एस टी सजवून रॅली काढण्यात आली . उपसरपंच राजेश करवीर, आगार व्यवस्थापक प्रमोद तेवलेकर ,अशोक बाबर, पालक अधिकारी मानिनी तेवलेकर, यांच्या हस्ते प्रवाशांना गुलाब पुष्प देण्यात आले. कार्यक्र मास वाहक सांगले, नियंत्रक अशोक माळी, दीपक पाटील, विलास पाटील, संजय पाटील, अजित पाठक, आदि मान्यवर उपिस्तत होते कार्यक्र माचे सूत्र संचलन निवृत्त कर्मचारी सुभाष मोरे यांनी केले.
डहाणू आगारात एसटीचा वर्धापन दिन अत्यंत उत्साहात
By admin | Published: June 02, 2017 4:49 AM