शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
5
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
6
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
7
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
8
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
9
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
10
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
11
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
12
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
13
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
14
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
15
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
16
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
17
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
18
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
19
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
20
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत

नुकसान १६८ कोटी, भरपाई फक्त ६७ कोटी

By admin | Published: December 22, 2015 12:15 AM

कोकणातील पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बागायतीमधील बहरून आलेले आंबा व काजू फेब्रुवारी - मार्च २०१५ मध्ये झालेल्या अवकाळी पावसाने उध्वस्त झाले होते.

हितेन नाईक,  पालघरकोकणातील पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बागायतीमधील बहरून आलेले आंबा व काजू फेब्रुवारी - मार्च २०१५ मध्ये झालेल्या अवकाळी पावसाने उध्वस्त झाले होते. यावेळी १ लाख ८० हजार ९९६ एकर क्षेत्रातील १ लाख ८१ हजार ९११ शेतकऱ्यांचे सुमारे १६८ कोटी ३२ लाख ५१ हजाराचे नुकसान झाले होते. तिच्या भरपाईपोटीे या शेतकऱ्यांना केवळ ६७ कोटी ४४ लाख ११ हजार रू.ची तुटपुंजी भरपाई दिल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.राज्यात सर्वाधिक आंबा व काजूचे उत्पादन घेणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील ६४ हजार ८७४ शेतकऱ्याच्या ८० हजार ५३६.५३ एकर क्षेत्रातील आंबा व काजूचे ७९ कोटी ५३ लाख ७५ हजाराचे नुकसान झाल्याचे पंचनामे करण्यात आले होते. मात्र शासनाने केवळ २५ कोटी ९३ लाख ५७ हजार रू. ची भरपाई दिली आहे. ठाणे जिल्ह्यात ४ हजार ९०९ शेतकऱ्यांच्या ५ हजार ४०१.९५ एकर क्षेत्रात ४ कोटी १९ लाख ५३ हजाराचे नुकसान झाले असून २ कोटी ७२ लाख १२ हजार रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे. सिंधूदुर्ग जिल्ह्यातील ४६ हजार २४३ शेतकऱ्यांच्या ३७ हजार ९६५.३५ एकर क्षेत्रातील आंबा, काजू, पिकाच्या ३७ कोटी ९१ लाख ७५ हजाराच्या नुकसानीपैकी शासनाने १३ कोटी ५ लाख १६ हजार रू.ची भरपाई मंजूर केली आहे तर रायगड जिल्ह्यात ४३ हजार ५८९ शेतकऱ्यांच्या ४३ हजार ७७३.१५ एकर क्षेत्रातील आंबा, काजू च्या ४३ कोटी ७९ लाख ७५ हजाराच्या नुकसानीपैकी १५ कोटी ८५ लाख ५३ हजाराची भरपाई मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे कोकणातील एकूण १६८ कोटी ३२ लाख ५१ हजाराच्या नुकसानीपैकी केवळ ६७ कोटी ४४ लाख ११ हजाराची भरपाई बागायतदारांना मिळणार आहे. उर्वरीत १०० कोटी ८८ लाख ४० हजाराची नुकसान भरपाई कशी होणार व कोण भरून देणार असा प्रश्न बागायतदारांमधून उपस्थित केला जात असून शासन शेतकऱ्यांप्रती उदासीन असल्याची टीका होत आहे.