ठाणे : जिल्ह्यात आधीच राजकारणांतील घटनांसह गुन्हेगारी पाश्वभूमीच्या घटना वाढत आहेत. त्याकडे लक्ष वेधले जात असतानाच गुरूवारी संध्याकाळी अचानक हवामानात बदल हाेऊन वादळवारा सुरू झाला. त्यामुळे विद्यूत पुरवठा खंडीत हाेऊन उपनगरीय वाहतूक खाेळंबली. तर ग्रामीण भागातील अंबरनाथ, मुरबाड तालुक्यातील बहुतांशी नर्सरीतील विविध राेंपाचे नुकसान झाले.याशिवाय तब्बल ५४ हेक्टरमधील आंबराईतील आंब्याच्या नुकसानीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
वादळवाऱ्र्यासह अवकाळी पावसाच्या सरी ठाण्यासह कल्याण, डाेंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मुरबाड, शहापूर आणि भिवंडीच्या शहरी व ग्रामीण भागाला बसला आहे. तब्बल १६ एमएम पाऊस पडल्याची नाेंद घेण्यात आलेली आहे. यामध्ये उल्हासनगरला सर्वाधिक पाऊस पडला. तर या खालाेखाल पाऊस व जाेरदार वादळवार्याचा फटका अंबरनाथ बदलापूर आणि मुरबाड तालुक्यातील शेतीला बसला आहे. कारले, दुधीभाेपळा, वाल आदींच्या वेलींनी या वार्यामुळे लाेळन घेतले आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकर्यांसह उल्हाळी भाताच्या नुकसानीलाही शेतकर्यांना काही अंशी ताेंड द्यावे लागले आहे.
पावसाळ्यात लागणार्या विविध राेपाची लागवड करून त्यांची वाढ करणार्या बहुतांशी नर्सरींमधील राेपांचे नुकसान झाले आहे. तर अंबरनाथ, मुरबाड परिसरातील ५४ हेक्टरच्या आंब्यांचे नुकसान झाले आहे. वार्यामुळे फळे गळून पडली आहे. तर ठिकठिकाणच्या फार्म हाऊसमधील लावण केलेले आंब्याची झाडे झुकल्यामुळे शेतकर्यांचे नुकसान झाले. या वृत्तास जिल्हा प्रशासनानेही दुजाेरा दिला आहे. त्यामुळे या नुकसानीचे पंचनामे वेळीच करण्यासाठी मात्र कर्मचारी उपलब्ध नाही. बेमुदत संपामुळे पंचनाम्याची काम आता रखडली आहे.
या वादळी पावसामुळे नाशिक येथून आलेल्या शेतकर्यांच्या माेर्चाही या पावसात झाेडपला आहे. वासिंदे येथील मैदानावर थांबवण्यात आलेल्या या माेर्चातील शेतकर्यांना वादळाच्या धुळीने फार त्रास झाला. तर पावसादरम्यान त्यांनी ताडपत्री अंगावर घेऊन पावसापासून सुरक्षा केली. जिल्ह्यातील ग्रामीण भागात पेटलेल्या वीटभट्या काही अंशी विझल्यामुळे नुकसान झाल्याचे बाेलले जात आहे. ओल्या विटाही विरघळल्या आहेत दरम्यान या वीटभट्टीवरील कामगारांची चांगलीच पळापळ झाली.