मुरबाड : गेल्या दोन ते तीन दिवसापूर्वी तालुक्यातील शिरोशी, टोकावडे, शेलगाव, माळ, वैशाखरे अशा सुमारे पंचवीस ते तीस गावात झालेल्या वादळी पावसाने शेकडो घरांचे नुकसान झाले. या घरांमध्ये राहणारी कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. अगोदरच रोजगार तसेच अन्नधान्यापासून वंचित असणारी कुटुंबे उघड्यावर दिवस काढत आहेत.पावसाळा सुरु होण्यापूर्वी प्रत्येकजण पावसाळ््यापासून घराचा बचाव करण्यासाठी काळजी घेत असतो. टोकावडे परिसरातील शिरोशी, वेळुक, माळ, शेलगाव, वैशाखरे आणि धसई परिसरातील अनेक गावांमध्ये दोन दिवसांपूर्वी वादळी पावसाने थैमान घातले. यात घरांचे नुकसान झाले असून अनेक कुटुंब रस्त्यावर आली आहेत. अगोदरच रोजगारासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करणाऱ्या नागरिकांपुढे निवाºयाचा प्रश्न उभा राहिला असून मागील महिन्यात मतांसाठी फिरणाºया नेत्यांनी बेघर कुटुंबांची साधी भेटही घेतलेली नाही.या परिसरातील नागरिकांवर ओढावलेल्या नैसर्गिक आपत्तीने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश जरी तहसीलदारांनी दिले असले तरी तालुक्यात पावसाचा जोर वाढत असल्यामुळे त्यांना तात्काळ मदत देऊन निवाºयाची सुविधा उपलब्ध केव्हा होईल या प्रतीक्षेत नागरिक आहेत. प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.पंचनामे करण्याचे दिले आदेशनैसर्गिक आपत्तीत शेकडो घरांचे नुकसान होऊन काही कुटुंबे रस्त्यावर आली असल्याने त्याचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश मंडळ अधिकारी व तलाठी यांना दिले आहेत. ते मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवून बांधकाम विभागाच्या अहवालानुसार भरपाई देण्यात येईल, असे तहसीलदार अमोल कदम यांनी सांगितले. दरम्यान, खासदार कपिल पाटील यांनी घटनास्थळी भेट द्यावी अशी मागणी राष्ट्रवादीचे सरचिटणीस प्रकाश पवार यांनी केली आहे.
मुरबाड तालुक्यातील घरांचे वादळी पावसाने केले नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 12:16 AM