शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

डान्सबार, हॉटेलांची, हुक्का पार्लरची अवैध बांधकामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 2:04 AM

डान्सबार, हुक्का पार्लर, हॉटेलांनी उल्हासनगरात मोठ्या प्रमाणात अवैध बांधकामे केली असून तेथील छुप्या खोल्यावर कारवाई करा

उल्हासनगर : डान्सबार, हुक्का पार्लर, हॉटेलांनी उल्हासनगरात मोठ्या प्रमाणात अवैध बांधकामे केली असून तेथील छुप्या खोल्यावर कारवाई करा, अशी मागणी शिवसेनेने महासभेत केली. यातून अवैध बांधकामाचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला. आयुक्तांचा आदेश धाब्यावर बसवून शेकडो अवैध बांधकामे उभी राहत असून अधिकाऱ्यांनी बघ्याची भूमिका घेतल्याची टीकाही करण्यात आली.यापूर्वी पोलीस उपायुक्तांच्या पत्रानुसार महापालिकेने डान्सबार, हुक्का पार्लर व हॉटेलमधील छुप्या खोल्या तोडल्या होत्या. नंतर पालिकेने दुर्लक्ष केल्याने त्यातील अनेक अवैध बांधकामे पुन्हा उभी राहिली. तोच संदर्भ विरोधी पक्षनेता धनंजय बोडारे यांनी दिला. मात्र संबंधित विभागाचे अधिकारी युवराज भदाणे यांनी अवैध बांधकामे झाल्याचा इन्कार केला. त्यातील काहींनी न्यायालयातून स्थगिती आदेश आणल्याचे सांगितले.तेव्हा भाजपाचे नगरसेवक मनोज लासी, शिवसेनेचे राजेंद्र चौधरी व विरोधी पक्षनेता धनजंय बोडारे यांनी भदाणे यांना धारेवर धरले. ‘महासभेत चुकीची माहिती देऊ नका. महापौर, तुम्ही माझ्यासोबत चला. आधी तोडलेल्या छुप्या अवैध खोल्या पुन्हा जशाच्या तशा उभ्या राहिल्याचे दाखवून देतो,’ असे आव्हान लासी यांनी दिले. त्यामुळे भदाणे यांना कारवाईचे आश्वासन द्यावे लागले.