कल्याण - मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या पुर परिस्थतीचा कोण कसा फायदा घेईल याचा नेम नाही. परंतु, आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी पावसाच्याच पाण्यात वाहत येणाऱ्या प्लास्टीकच्या पिशव्या आणि अन्य साहित्य गोळा करणारा हा भांगर वेचक आज सायंकाळी ४ .१५ वाजताच्या सुमारास मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पुना लिंक रोडच्याखाली लोकग्रामकडे जाणाऱ्या आणि न थेट श्रीमलंग डोंगराकडून प्रचंड वेगाने वाहत येणाऱ्या या नाल्यातील पाण्यात प्लास्टीकच्या बाटल्या आणि अन्य भंगार सामान वाहत येवून या ठिकाणी असलेल्या भल्या मोठ्या जलवाहीणीला अडकून बसते. हेच साहित्य हा भंगार वेचक आपल्या जिवाची पर्वा न करताना गोळा करत होता. हे करत असताना त्याचा जराही तोल गेला तरी तो प्रचंड वाहणाऱ्या पाण्याबरोबर थेड रोड खालच्या नाल्यात वाहून जाण्याची शक्यता असतानाही त्याचे काम चालू होते. या धोक्याची त्याला जेव्हा समज देण्यात आली तेव्हा मात्र त्याने तेथून काढता पाय घेतला.
Video : पोटाची आग आणि जीवघेणं धाडस; भंगार वेचकाचं भरपावसात काम सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2019 8:47 PM
सायंकाळी ४ .१५ वाजताच्या सुमारास मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
ठळक मुद्दे पाण्याबरोबर थेड रोड खालच्या नाल्यात वाहून जाण्याची शक्यता असतानाही त्याचे काम चालू होते.या धोक्याची त्याला जेव्हा समज देण्यात आली तेव्हा मात्र त्याने तेथून काढता पाय घेतला.