सदानंद नाईक, उल्हासनगर : कॅम्प नं-५, नेताजी गार्डन परिसरातील कमल अपार्टमेंट नावाची अतीधोकादायक इमारत जेसीबी मशीनच्या सहाय्याने गुरवारी दुपारी जमीनदोस्त केली. इमारत कोसळून नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होऊ नये म्हणून इमारतीवर पाडकाम कारवाई करण्यात आल्याची माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली.
उल्हासनगर महापालिकेने सुरक्षेचा उपाय म्हणून अतिधोकादायक इमारती खालीकरून त्या पाडण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अतीधोकादायक इमारती टप्याटप्याने पाडण्यात येत आहे. शहरात अश्या अनेक धोकादायक इमारती उभ्या असून त्यापासून नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला. नेताजी गार्डन परिसरात अनेक वर्षांपासून कमल अपार्टमेंट नावाची ५ मजली इमारत उभी आहे. त्या इमारतीवर महापालिकेने मोठ्या जेसीबी मशिनद्वारे गुरवारी पाडण्यात आली. जेसीबी मशीन इमारत पाडण्यासाठी सुरू करताच जीर्ण झालेली इमारत पत्यासारखी कोसळली. इमारत पाडण्यापूर्वी परिसर निर्मनुष्य केल्याची माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली. तसेच बेवारस अवस्थेत शहरात असलेल्या अतीधोकादायक इमारत पडण्याचे संकेत शिंपी यांनी दिले. इमारत पाडण्या साठी येणारा खर्च इमारत प्लॅटधारकांच्या मालमत्ते करा मध्ये समाविष्ट करण्यात येणार असल्याचे, पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"